Advertisements
Advertisements
Question
पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.
Solution 1
पर्यटनाचे अनेक प्रकारांत वर्गीकरण करण्यात येते. यांतील प्रमुख तीन प्रकार –
- ऐतिहासिक पर्यटन: पर्यटन आणि इतिहास यांचे नाते अतूट आहे. म्हणूनच जगभरातील पर्यटकांचा ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी ओघ वाढतच आहे. आपल्या पूर्वजांचे पराक्रम, त्यांनी निर्मिलेल्या वास्तू पाहणे हा कुतूहलाचा विषय असतो. शिवरायांनी बांधलेले किल्ले, राजांचे राजवाडे, स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची स्मारके, महात्मा गाँधी, आचार्य विनोबा भावे यांसारख्या विभूतींचे आश्रम अशा ऐतिहासिक स्थळांना पर्यटक भेटी देतात. जगभरातच असे ऐतिहासिक पर्यटन मोठ्या प्रमाणात केले जाते.
- भौगोलिक पर्यटन: अभयारण्ये, समुद्रकिनारे, नद्यांचे संगम, लोणारसारखी उल्कापाताने निर्माण झालेली सरोवरे, बेटे, धबधबे, पर्वतराजी व अभयारण्ये हे प्रत्येक देशाचे वैभव असते. निसर्गराजीत राहायला, निसर्गाचा आनंद उपभोगायला प्रत्येकालाच आवडतो.
निसर्गाची ओढ, कुतूहल आणि विरंगुळा यांसाठी जगभरातील लोक अशा ठिकाणांना भेटी देतात. हे भौगोलिक पर्यटन होय. - आंतरराष्ट्रीय पर्यटन: आधुनिक काळात झालेल्या वाहतुकीच्या सोयींमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा, विश्वसंमेलने, बैठका, व्यावसायिक कामे, स्थलदर्शन, धार्मिक स्थळांना भेटी आदी निमित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटन मोठ्या प्रमाणात चालते. आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरण यांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळालेली आहे.
Solution 2
- स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन:
- स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटनामध्ये व्यक्ती देशातल्या देशातच प्रवास करतात.
- हा प्रवास सुलभ असतो, कारण व्यक्ती आपल्या स्वत:च्या देशातच प्रवास करत असते.
- देशांतर्गत प्रवास असल्यामुळे या प्रवासादरम्यान भाषा, चलन, कागदपत्रे यांचा फारसा अडथळा नसतो.
- या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेप्रमाणे आपण या पर्यटनाचे नियोजन करू शकतो.
- आंतरराष्ट्रीय पर्यटन:
- हा पर्यटनाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन म्हणजे देशाच्या सीमेपार केलेले पर्यटन.
- जहाज, रेल्वे आणि विमान यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन करणे हे पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे. जहाजांमुळे समुद्रकिनाऱ्यांवरचे देश जोडले गेले आहेत, तर रेल्वेमुळे युरोप जोडला गेला आहे. विमान वाहतुकीमुळे जग जवळ आले आहे.
- आर्थिक उदारीकरणानंतर (१९९१ नंतर) भारतातून परदेशात जाणाऱ्यांची व परदेशातून भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. अभ्यास, विरंगुळा, स्थलदर्शन, व्यावसायिक कामे (बैठका, करारमदार इत्यादी.), चित्रपटांचे चित्रिकरण इत्यादी कामांसाठी देशविदेशांत ये-जा करणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे.
- आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी अधिकृत कागदपत्रे सोबत ठेवावी लागतात. उदा. पासपोर्ट व्हिसा इत्यादी.
- ऐतिहासिक पर्यटन:
- ऐतिहासिक पर्यटनामध्ये पर्यटक किंवा पर्यटकांचा समूह मुख्यत: इतिहास, महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना घडलेली ठिकाणे, महत्त्वाच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांशी निगडित ठिकाणे इत्यादी ठिकाणी भेटी देतात.
- देशपातळीवर राजस्थानमधील किल्ले, महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित आश्रम, १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित स्थळे यांसारख्या ऐतिहासिक ठिकाणांच्या सहलींचे आयोजन केले जाते.
- लोकांचे इतिहासविषयीचे कुतूहल लक्षात घेऊन ऐतिहासिक पर्यटन सहली आयोजित केल्या जातात. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक गोपाळ नीळकंठ दांडेकर 'दुर्गभ्रमण यात्रां'चे आयोजन करत असत.
- भौगोलिक पर्यटन:
- एखाद्या प्रदेशातील विविध भौगोलिक वैशिष्ट्यांचे निरीक्षण करण्यासाठी भौगोलिक पर्यटन केले जाते.
- भौगोलिक स्थळांचे अवलोकन करण्याच्या इच्छेमुळे आणि कुतूहलामुळे अनेक पर्यटक भौगोलिक पर्यटनामध्ये सहभागी होतात. अभयारण्ये, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स (उत्तराखंड), समुद्र किनारे महाराष्ट्रातील लोणार येथील सरोवर निघोज येथील रांजणखळगे इत्यादींचा समावेश भौगोलिक पर्यटन स्थळांमध्ये होतो.
- आरोग्य पर्यटन:
- या प्रकारचे पर्यटन वैद्यकीय उपचार घेणे किंवा प्रकृती/आरोग्य सुधारणे या हेतूने केले जाते.
- पाश्चात्त्यांच्या मते भारतामधील वैद्यकीय सेवा व सुविधा स्वस्त व दर्जेदार आहेत. यामुळे, अनेक परदेशी लोक वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येऊ लागले आहेत.
- भारतामध्ये मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध असल्याने याचा लाभ घेण्यासाठी अनेक पर्यटक भारतामध्ये येतात.
- याव्यतिरिक्त, योगशिक्षण आणि आयुर्वेदिक उपचारांकरताही अनेक परदेशी पर्यटक भारतामध्ये येत असतात.
- कृषी पर्यटन:
- शहरी संस्कृतीत वाढलेल्या व कृषी जीवनाची माहिती घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांकरता 'कृषी पर्यटन' हा प्रकार सध्या झपाट्याने विकसित होऊ लागला आहे.
- हे विशेषतः शहरी लोकसंख्येसाठी आहे ज्यांना ग्रामीण जीवन आणि शेतीशी फारच कमी संपर्क आहे.
- शेतकरीसुद्धा अधिक प्रगत शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी, त्यातील नावीन्यपूर्ण उपाययोजना, संशोधन अभ्यासण्यासाठी दूरवरच्या प्रदेशात पर्यटन करतात.
- विविध कृषी संशोधन केंद्रे, कृषी विद्यापिठांना भेटी देणे, इस्राएलमधील शेती पाहणे या उद्देशाने आज कृषी पर्यटन केले जाते.
- क्रीडा पर्यटन:
- विसाव्या शतकामध्ये हा पर्यटन प्रकार उदयास आला आहे. राज्यातील, देशातील व परदेशांतील विविध ठिकाणी क्रीडा सामने पाहायला जाणे म्हणजे क्रीडा पर्यटन होय.
- राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात.
- जागतिक पातळीवर ऑलिम्पिक, विंबल्डन आणि जागतिक बुद्धिबळ स्पर्धा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा, तर भारतीय पातळीवर हिमालयीन कार रॅली व महाराष्ट्र पातळीवर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यांसारख्या स्पर्धांसाठी क्रीडा पर्यटन केले जाते.
- नैमित्तिक पर्यटन:
- पर्यटनाकरता माणूस कारणे शोधत असतो आणि २१ व्या शतकामध्ये अशा अनेक संधीदेखील उपलब्ध झाल्या आहेत.
- आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शने, संमेलने, चित्रपट महोत्सव, ग्रंथालय महोत्सव इत्यादी अनेक कारणांसाठी लोक विविध ठिकाणी जातात.
- महाराष्ट्रामध्येही अनेक साहित्यप्रेमी दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाकरता जात असतात.
- धार्मिक पर्यटन:
- विविध धर्म, पंथ व जातींचे लोक आपल्या श्रद्धेनुसार धार्मिक स्थळांना/तीर्थस्थळांना भेट देतात. त्याचबरोबर कला, संस्कृती, परंपरा आणि स्थापत्यशैली दर्शवणाऱ्या वारसास्थळांना भेटी देतात.
- जगामध्ये विविध समाजातील लोक विखुरले आहेत. जगातील काही भौगोलिक स्थळे प्रचलित पुराणकथांशी जोडली गेली असल्याने या लोकांमध्ये एकात्मतेची भावना टिकून राहते. यातून काही स्थळांना धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने भेट दिली जाते.
- चारधाम, बारा ज्योतिर्लिंगे ही धार्मिक पर्यटनाची काही उदाहरणे आहेत.
- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या व्यक्तिगत गंगाजळीतून बचतीमधून या धार्मिक स्थळी लोकांची सोय व्हावी, यासाठी लोकोपयोगी कामे केली आहेत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
टिपा लिहा.
कृषी पर्यटन
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
थोडक्यात टिपा लिहा.
कृषी पर्यटन
थोडक्यात टिपा लिहा.
क्रीडा पर्यटन
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
आयुर्वेदिक उपचारासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.
पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
नैसर्गिक चिकित्सा केंद्रात उपचारांसाठी जॉन व अमरला केरळात जावे लागले.
पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
पुंडलिकरावांनी सहपरिवार चारधाम यात्रा केली.
पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
पुण्यातील रामेश्वरी आपल्या मैत्रिणीसह हुरडा पार्टी व शेतीविषयी माहिती मिळवण्यासाठी गावाला जाऊन आली.
पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले.
पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात?
पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावर उपाययोजना सुचवा.
पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. सकारण सांगा.
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा नकाशा दिला आहे. त्याच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणांची यादी करा. ही ठिकाणे येथे असण्याची कारणे सांगा.
(आ) वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध कोणकोणत्या ठिकाणी दिसून येतो?