English

पर्यटनाला चालना देण्यासाठी काय करायला हवे? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पर्यटनाला चालना देण्यासाठी काय करायला हवे?

Answer in Brief

Solution

पर्यटनाला चालना देण्यासाठी पुढील गोष्टी करायला हव्यात. 

१. पर्यटकांनी ऐतिहासिक वारसास्थळांचे विद्रुपीकरण न करता, त्यांच्यावर मजकूर न कोरता आपला ऐतिहासिक वारसा जपणे अत्यावश्यक आहे.

२. त्याचप्रमाणे पर्यटकांनी पर्यटनस्थळांच्या स्वच्छतेकडेही लक्ष केंद्रित करणे व नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

३. दुरावस्था झालेल्या पर्यटनस्थळांची डागडुजी करणे, तसेच नियमावली तयार करून त्याची कठोर कार्यवाही करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

४. परदेशी पर्यटकांकरता जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या भाषांतून त्या त्या पर्यटनस्थळांविषयीच्या माहितीपुस्तिका, मार्गदर्शिका, नकाशे, इतिहासविषयक पुस्तके उपलब्ध करून देणे, परदेशी पर्यटकांना गाडीतून फिरायला नेणाऱ्या वाहनचालकांना दुभाषाचे प्रशिक्षण देणे, त्यांनी मार्गदर्शक म्हणूनही काम करावे यासाठी योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

५. पर्यटकांची वाहतूक व सुरक्षितता, प्रवासातील इतर सुखसोई, जसे- उत्तम दर्जाच्या निवासस्थानांची व स्वच्छतागृहांची सोय करणे.

६. तसेच, दिव्यांग पर्यटकांच्या गरजांकडे विशेष लक्ष देणे.

shaalaa.com
ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.8: पर्यटन आणि इतिहास - लांब उत्तरे २

APPEARS IN

SCERT Maharashtra History and Civics [Marathi] 10 Standard SSC
Chapter 1.8 पर्यटन आणि इतिहास
लांब उत्तरे २ | Q ५. १.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×