Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.
Short Note
Solution
नैसर्गिक वारशामध्ये निसर्गातील जैववैविध्याचा विचार केला जातो. तर सांस्कृतिक वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती व परंपरा होय. भारताला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा आपण जपला पाहिजे; कारण
- आपल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. या ऐतिहासिक वारशामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते.
- विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नदया, पर्वत, जंगले, अभयारण्ये, समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येतात.
- भारतीय नृत्य, साहित्य, विविध कला, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात. आपला नैसर्गिक आणि पूर्वजांनी दिलेला सांस्कृतिक वारसा हे आपले वैभव असून तो पुढील पिढ्यांसाठी आपण जपला पाहिजे.
shaalaa.com
ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन
Is there an error in this question or solution?