Advertisements
Advertisements
Question
पुढील घटक (फूल) तुमच्याशी बोलत आहे, अशी कल्पना करून त्या घटकाचे (फुलाचे) आत्मवृत्त लिहा.
Solution
फुलाचे आत्मवृत्त
नमस्कार, मी एक फूल. आजच्या प्रदर्शनात तुम्ही माझ्याकडे किती उत्सुकतेने पाहत आहात हे मला दिसत आहे आणि त्याचा मला खूप आनंद होत आहे. आज मी या प्रदर्शनातील फुलांचा राजा ठरलो आहे! पण माझे भवितव्यही मला माहीत आहे. दोन-चार दिवसांत मी सुकून जाणार आहे.
माझे जीवन खूपच अल्पकालीन असते. माझी उत्पत्ती मातीतील बियाण्यापासून सुरू होते. या बियाण्यामधून एक अंकुर उगवतो, जो पुढे एक रोप बनतो. हे रोप हळूहळू वाढत जाते. माझा जन्म या वाढलेल्या रोपावरील कळीच्या रूपात होतो. प्रारंभी मी खूप छोटा असतो, परंतु कालांतराने मी वाढतो. कळी पूर्ण फूल बनण्यासाठीही दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. फूल म्हणून माझा संपूर्ण विकास होण्यासुद्धा तितकाच कालावधी लागतो.
माझा रंग गुलाबी असला तरी गुलाबाचे इतरही अनेक रंग असतात जसे की पांढरा, पिवळा, केशरी इत्यादी. गुलाबाच्या उत्पत्तीसाठी काट्यांच्या मध्ये वाढणे आवश्यक असते. आयुष्यातील अडचणींना पेलणे हे जीवनाचे मूलभूत सिद्धांत आहे. इतरांना आनंद देणे हे आमच्या अस्तित्वाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
काही जण आम्हाला देवाच्या चरणात अर्पण करतात; तर काही आम्हाला केसात गुंफतात. आमच्यापासून गुलकंद बनवले जाते, आणि काही लोक आमचा वापर अत्तर किंवा परफ्यूम बनविण्यासाठी करतात. जर असे नाही झाले तर आमचा अंत सुकण्यानेच होतो. पण, जोपर्यंत आमचे जीवन आहे, तोपर्यंत आम्ही इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो; हा माझा तुम्हाला संदेश आहे. यातच आमच्या जीवनाची खरी किंमत आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
किसी पालतू प्राणी की आत्मकथा लिखिए।
‘जल है तो कल है’ विषय पर अस्सी से सौ शब्दों में निबंध लिखिए।
‘संदेश वहन के आधुनिक साधनों से लाभ-हानि’ विषय पर अस्सी से सौ शब्दों तक निबंध लिखिए।
बढ़ते हुए प्रदुषण (वायु, ध्वनि) का स्वास्थ पर बुरा असर पड़ रहा है, विषय पर अपने विचार लिखिए |
‘बुरी संगति किसी को भी दिशाहीन बना सकती है’ इसपर तर्क सहित अपने विचार लिखिए।
‘मैं प्रकृति बोल रही हूँ’ विषय पर निबंध लेखन कीजिए।
‘देश की उन्नति में युवाओं का योगदान’ विषय पर अपने विचारों की मौखिक तथा लिखित अभिव्यक्ति कीजिए।
आपके द्वारा आँखों देखी किसी घटना/दुर्घटना का विवरण अपने शब्दों में लिखिए।
निम्नलिखित दिए गए शीर्षक पर लगभग 150 शब्दों में रचनात्मक लेखन लिखिए।
मेरे बगीचे में खिला गुलाब
निम्नलिखित दिए गए शीर्षक पर लगभग 150 शब्दों में रचनात्मक लेखन लिखिए।
विद्यालय में मेरा प्रिय कोना
निम्नलिखित विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए:
मेरा प्रिय त्योहार
निम्नलिखित विषय पर लगभग 70 से 80 शब्दों में निबंध लिखिए:
मैं पृथ्बी बोल रही हूँ...
निम्नलिखित दिए गए शीर्षक पर लगभग 120 शब्दों में रचनात्मक लेख लिखिए।
गरमी की पहली बारिश
निबंध लिखिए:
ईमानदारी
निबंध लिखिए-
विद्यार्थी और अनुशासन
निबंध लिखिए-
आवश्यकता ही आविष्कार की जननी है।
निम्नलिखित विषय पर लगभग (80-100) शब्दों में निबंध लिखिए।
स्वच्छता
निम्नलिखित विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए।
एक किसान की आत्मकथा
‘यदि मैं शिक्षा मंत्री होता -----’ विषय पर लगभग सौ शब्दों में निबंध लिखिए।