Advertisements
Advertisements
Question
पुढील कवितेच्या खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण (०८)
झाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत... पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग रक्त होते क्षणभर हिरवेगार आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत झाडाचे बाहु सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणे दडलेले असते हसावं कसं सळसळत्या पानासारखं मुळावं मुरावं कसं तर? झाडासारखं घट्ट पाय रोवीत जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं! |
मुद्दे:
१. प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री- (०१)
२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)
३. कवितेतील दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ लिहा. (०२)
'हसावं कसं सळसळत्या पानासारखं'
४. कवितेत आलेल्या शब्दांचे अर्थ लिहा. (०२)
- शरीर-
- वस्त्र-
- अलगद-
- मंजुळ-
५. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण- (०२)
६. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश - (०२)
Solution
१. कवी - ‘जॉर्ज लोपीस’
२. कवितेचा विषय - झाडांमधील विविध गुण स्वत:मध्ये रुजवण्याचा संदेश
३. झाडांची पाने जेवढ्या मनमोकळेपणाने सळसळतात तेवढ्याच मनमोकळेपणाने आपणही हसावे, ज्याप्रमाणे मातीत घट्ट पाय रोवून झाड खंबीरपणे उभे असते, तेवढ्या खंबीरपणे आपण मुरावे.
४.
- तनू, काया
- कापड
- हळुवार
- मधुर, गोड, सुरेल
५. 'हिरवंगार झाडासारखं' या कवितेत साध्या-सोप्या शब्दांत कवीने झाडांच्या गुणांचे वर्णन केले आहे. झाड जणू काही एखादे व्यक्तिमत्त्व आहे, असे समजून कवी झाडांविषयी बोलत आहे. ही कवीची अनोखी कल्पना मला फार आवडली. ही कविता मुक्तछंदातील आहे. त्यामुळे, येथे यमक आढळत नाही; पण झाडांविषयीच्या उत्कट, तरल (सूक्ष्म) भावना कवी सहज व उत्स्फूर्तपणे व्यक्त करतो. पानझडीचा काळ संपल्यावर झाड हिरव्यागार, नव्याकोऱ्या पानांनी नव्या नवरीप्रमाणे सजून जाते ही कविकल्पना मला फार आवडली. झाडाचे अत्यंत लोभसवाणे व्यक्तिमत्त्व कवीने बारकाव्यांसह अत्यंत संवेदनशीलपणे टिपले आहे. या सर्व गोष्टींमुळे ही कविता मला फार आवडते.
६. 'हिरवंगार झाडासारखं' या कवितेत झाडांच्या सहनशीलता, परोपकारी वृत्ती, दानीपणा, कठीण प्रसंगांतही घट्ट पाय रोवून उभे राहण्याचा खंबीरपणा अशा गुणांचे वर्णन केले आहे. आनंदी व समृद्ध जीवन जगण्यासाठी मानवानेही हे सगळे गुण आपल्या अंगी बाणवायला हवेत. तसेच, झाडांसारखे हिरवेगार, ताजे व प्रफुल्लित जीवन जगायला हवे असा संदेश कवीने या कवितेतून दिला आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
वाक्य पूर्ण करा.
कवीने झाडाला दिलेली उपमा-
वाक्य पूर्ण करा.
कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे-
वाक्य पूर्ण करा.
अलगद उतरणारे थेंब-
वाक्य पूर्ण करा.
पानझडीनंतरचे, नवी वस्त्रेधारण करणारे झाड म्हणजे-
वाक्य पूर्ण करा.
फुटते शरीरभर पालवी याचा अर्थ-
आकृती पूर्ण करा.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
झाडाच्या मुळावर घाव घातल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
झाडाच्या जीवनाचं गाणं कशात दडलेलं असतं?
खालील ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं.
खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर
अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब’
‘झाडापासून आनंदी जगणे शिकावे’, या विधानातील विचार स्पष्ट करा
पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. गुण (०८)
१. चौकट पूर्ण करा. (०२)
झाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत... पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग रक्त होते क्षणभर हिरवेगार आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत झाडाचे बाहु सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणे दडलेले असते हसावं कसं सळसळत्या पानासारखं मुळावं मुरावं कसं तर? झाडासारखं घट्ट पाय रोवीत जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं! |
२. चौकट पूर्ण करा. (०२)
१. खालील गोष्टी पाहून कवीच्या मनात आलेले विचार लिहा.
अ. हिरवा रंग
आ. झाडांचे बाहु
२. संकल्पना स्पष्ट करा. (०१)
दव
३- शब्दांचे अर्थ
१. कवितेतील पुढील शब्दांचे अर्थ सांगा. (०२)
- गाणे -
- झाड -
- नवरी -
- पक्षी -
४- काव्यसाैंदय
१. ‘अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब’ या ओळीतील विचारसाैंदर्य सांगा. (०२)
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
झाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत... पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग रक्त होते क्षणभर हिरवेगार आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत झाडाचे बाहु सरसावलेले असतात मुसाफिराना कवेत घेण्यासाठी पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणे दडलेले असते हसावं कसं सळसळत्या पानासारखं मुळावं मुरावं कसं तर? झाडासारखं घट्ट पाय रोवीत जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं! |
1. चौकटी पूर्ण करा. (2)
- मुळावर घाव घातले; तरी मुकाट सहन करणारे - ______
- अलगद उतरणारे थेंब - ______
2. आकृती पूर्ण करा. (2)
3. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)
- मुकाट -
- मुसाफिर -
- संथ -
- मौन व्रत -
4. काव्यसाैंदर्य: (2)
'जगावं कसं तर? हिरव्या झाडासारखं' या ओळीतील अर्थसाैंदर्य स्पष्ट करा.
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | ‘हिरवंगार झाडासारखं’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर। अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब॥’ |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) खुडलेल्या - |
(ii) पालवी - | |
(iii) मरगळ - | |
(iv) मंजुळ - |