English

पुढील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दांत लिहा. ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये लिहा. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

पुढील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दांत लिहा.

ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये लिहा.

Answer in Brief

Solution

  • ब्रायोफायटा गटातील वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे ‘उभयचर’ म्हटले जाते, कारण त्या ओलसर मातीत वाढतात. परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते.
  • या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात. यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते.
  • ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपटी रिबिनीसारखी लांब असते.
  • या वनस्पतींना खरी मुळे, खोड, पाने नसतात तर पानांसारख्या रचना असतात व मुळांऐवजी मुळांसारखे अवयव मुलाभ असतात.
  • पावसाळ्यात जुन्या ओलसर चिंतीवर, विटांवर आणि खडकांवर पाणी उपलब्ध असल्याने ही झाडे जोमाने वाढतात आणि हिरवा गालिचा तयार करतात.
  • पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात. उदा. मॉस (फ्युनारिआ), मर्केंशिया, ॲन्थॉसिरॉस, रिक्सिया, इत्यादी.
shaalaa.com
उपसृष्टी - अबीजपत्री वनस्पती - ब्रायोफायटा
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: वनस्पतींचे वर्गीकरण - स्वाध्याय [Page 80]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 6 वनस्पतींचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 3. उ. | Page 80
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×