Advertisements
Advertisements
Question
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
हक्काधारित दृष्टिकोन
Solution 1
- स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. ही पद्धती देशात अधिकाधिक रुजावी, प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले.
- लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ लाभार्थी' म्हणून पाहण्याचा सुरुवातीला या सरकारांचा दृष्टिकोन होता.
- इ.स. २००० नंतरच्या काळात मात्र 'नागरिकांचा हक्क' ही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या.
- म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणाचा तसेच अन्नसुरक्षेचा केवळ लाभ व्हावा; म्हणून कायदे केले गेले नाहीत; तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले. या भूमिकेलाच 'हक्काधारित दृष्टिकोन' असे म्हणतात.
Solution 2
१. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये भारताचे लोकशाहीकरण व्हावे यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या.
२. परंतु, यामध्ये नागरिकांकडे 'लाभार्थी' म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन होता.
३. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या सुधारणा 'नागरिकांचा हक्कच आहे' या भूमिकेतून केल्या जातात.
४. यानुसार भारतीय नागरिकांना माहितीचा, शिक्षणाचा व अन्नसुरक्षेचा अधिकार मिळाला आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
लोकशाहीचा गाभा म्हणजे ______.
भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
माहितीचा अधिकार
मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले?
______ सरकारला अधिक पारदर्शी आणि जनतेसाठी उत्तरदायी बनवते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे.