Advertisements
Advertisements
Question
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
माहितीचा अधिकार
Solution 1
- शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी, शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्परांविषयी विश्वास वाढावा यासाठी शासनाने २००५ साली नागरिकांना माहितीचा अधिकार दिला.
- या अधिकारामुळे गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार दडपले जाऊ शकत नाहीत.
- शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत, याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते.
- माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली आहे.
Solution 2
१. प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची दोन वैशिष्ट्ये आहेत. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला आहे.
२. माहितीचा अधिकार हा लोकशाहीमध्ये नागरिकांचे सक्षमीकरण करण्याचा एक प्रयत्न आहे. यामुळे, जनतेचा राज्यकारभारात प्रत्यक्ष सहभाग वाढत आहे.
३. शासन आणि नागरिक यांच्यातील संवादामुळे लोकशाही अधिक सकस, सुदृढ व बळकट होण्यास मदत होत आहे.
४. याबरोबरच माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली आहे.
RELATED QUESTIONS
लोकशाहीचा गाभा म्हणजे ______.
भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
हक्काधारित दृष्टिकोन
मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले?
______ सरकारला अधिक पारदर्शी आणि जनतेसाठी उत्तरदायी बनवते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे.