मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील संकल्पना स्पष्ट करा. माहितीचा अधिकार - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

माहितीचा अधिकार

टीपा लिहा

उत्तर १

  1. शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी, शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्परांविषयी विश्वास वाढावा यासाठी शासनाने २००५ साली नागरिकांना माहितीचा अधिकार दिला.
  2. या अधिकारामुळे गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार दडपले जाऊ शकत नाहीत.
  3. शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत, याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते.
  4. माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली आहे.
shaalaa.com

उत्तर २

१. प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची दोन वैशिष्ट्ये आहेत. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला आहे.

२. माहितीचा अधिकार हा लोकशाहीमध्ये नागरिकांचे सक्षमीकरण करण्याचा एक प्रयत्न आहे. यामुळे, जनतेचा राज्यकारभारात प्रत्यक्ष सहभाग वाढत आहे.

३. शासन आणि नागरिक यांच्यातील संवादामुळे लोकशाही अधिक सकस, सुदृढ व बळकट होण्यास मदत होत आहे.

४. याबरोबरच माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली आहे.

shaalaa.com
लोकशाही
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.1: संविधानाची वाटचाल - संकल्पना स्पष्ट करा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
पाठ 2.1 संविधानाची वाटचाल
संकल्पना स्पष्ट करा | Q ८. (अ) (२)
बालभारती History and Political Science (Social Science) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 2.1 संविधानाची वाटचाल
स्वाध्याय | Q ३. (२) | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×