Advertisements
Advertisements
प्रश्न
मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले?
उत्तर १
भारतीय संविधानाने सर्व स्त्री-पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठीची वयोमर्यादा किमान २१ वर्षे पूर्ण अशी ठेवली होती. ही मर्यादा १८ वर्षे करण्यात आल्याने:
- युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले.
- आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला.
- यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वांत मोठी लोकशाही बनली.
- या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली. युवा वर्गाच्या राजकीय जाणिवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली.
उत्तर २
मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे करून हा अधिकार आणखी व्यापक केला आहे. याचे परिणाम पुढीलप्रमाणे झाले.
- यामुळे, भारतामधील युवावर्गाला राजकीय अवकाश प्राप्त झाले.
- या बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जात असून हा बदल केवळ संख्यात्मक नसून गुणात्मक स्वरूपाचाही ठरला आहे.
- अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले आहेत.
- भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूपही यामुळे बदलून लोकांच्या इच्छा-आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष स्पर्धेत दिसत आहेत.
अशारीतीने, युवा मतदारांच्या सहभागामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढली आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
लोकशाहीचा गाभा म्हणजे ______.
भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
हक्काधारित दृष्टिकोन
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
माहितीचा अधिकार
______ सरकारला अधिक पारदर्शी आणि जनतेसाठी उत्तरदायी बनवते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे.