Advertisements
Advertisements
प्रश्न
सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय?
लघु उत्तर
उत्तर
सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, म्हणजे:
- ज्या सामाजिक बाबींमुळे, विचारांमुळे व्यक्तींवर वा काही लोकसमूहांवर अन्याय होतो, त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे.
- व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे.
- जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे.
- सर्वांना विकासाची समान संधी देणे.
- संविधानाने सामाजिक न्याय व समता या मूल्यांवर आधारित एक नवा समाज निर्माण करण्याचा मार्ग स्पष्ट केला आहे.
- यासाठी सर्व समाजघटकांना सामावून घेण्याबाबत काही प्रयत्न केले जातात. उदा. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा, वंचित घटकांकरता शिक्षण व रोजगारामध्ये राखीव जागांची तरतूद, अल्पसंख्याकांना समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क यांबाबत तरतूद, तसेच स्त्रियांसाठीचे विविध कायदे इत्यादी.
shaalaa.com
सामाजिक न्याय व समता
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ______ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे?
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व
न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे?
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
अन्याय-अत्याचार प्रतिबंधक कायदा
७३ व्या व ७४ व्या संविधान दुरुस्तीने ______च्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली.