Advertisements
Advertisements
Question
पुढील विषयांवर अहवालाचे लेखन करा:
तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रम.
Solution
नालंदा शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय आणि कला, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय नांदेड
अहवाल
दरवर्षीप्रमाणे यंदाही 'जागतिक पर्यावरण दिन बुधवार दि. ५ जून २०२० रोजी सकाळी आठ वाजता महाविद्यालयात साजरा करण्यात आला. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कनिष्ठ महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या मागच्या बाजूस असणाऱ्या पटांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
वृक्षारोपण कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शीतल देवस्थळी यांनी अध्यक्षस्थान भूषवले. शहरातील पर्यावरण प्रेमी आणि निवृत्त प्रशासकीय अधिकारी मा. श्री. अर्जुन नवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कनिष्ठ महाविदयालयातील अध्यापक, शहरातील निमंत्रित नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या 'गुलाब' फुलाच्या रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला. महाविद्यालयाचे जीवशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. अनिल राऊत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व प्रास्ताविकात नमूद केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आकाश परांजपे यांनी प्रमुख पाहुण्यांना शाल आणि तुळसीचे रोप देऊन स्वागत केले. बारावी कला शाखेची विद्यार्थी मृण्मयी बडे हीने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यानंतर प्रमुख पाहुणे मा. श्री. अर्जुन नवले यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला. सर्वप्रथम त्यांनी उपस्थितांना पर्यावरण दिनाची माहिती सांगितली. वेगवेगळ्या वृक्षांची नावे, उपयोग सांगितले. वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व ऐकताना उपस्थित श्रोते भारावून गेले होते. अर्जुन नवले यांनी गोष्टीच्या माध्यमातून वृक्षांची उपयुक्तता अधोरेखित केली. औषधी वनस्पतींची महत्त्वाची माहिती त्यांनी भाषणातून सांगितली.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शीतल देवस्थळी यांनी अध्यक्षीय भाषणात पर्यावरणाविषयी तज्ज्ञ व्यक्तींचे विचार सांगितले.
यानंतर उपस्थित सर्वजण वृक्षारोपण सहभागी झाले. प्रथमतः प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आंबा आणि चिंच यांचे रोपण करण्यात आले. प्राचार्याच्या हस्ते निलगिरीच्या रोपाचे रोपण करण्यात आले. यावर्षीच्या वृक्षारोपण सोहळ्यात कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग प्रतिनिधींनी देखील वृक्षारोपण केले. गुलाब, मोगरा, तुळस, जास्वंदी अशा फुलांच्या रोपांचे रोपण चार वर्ग प्रतिनिधींनी अनुक्रमे केले.
वृक्षारोपण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गोखले या बारावीतील विद्यार्थ्याने केले होते. भूगोल विभागातील प्रा. गीता नाईक यांनी उपस्थित सर्वांचे ऋण व्यक्त केले.
दोन तास सुरू असणाऱ्या कार्यक्रमाची सांगता 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' या संत तुकाराम महाराजांच्या अभंग गायनाने करण्यात आली
डॉ. अनिल राऊत
जीवशास्त्र विभाग
दि. ……… सचिव अध्यक्ष
APPEARS IN
RELATED QUESTIONS
अहवालाची आवश्यकता तुमच्या शब्दांत लिहा.
अहवालाचे स्वरूप स्पष्ट करा.
वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे, हे विधान स्पष्ट करा.
अहवाललेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा:
वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता.
अहवाललेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा:
शब्दमर्यादा.
अहवाललेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा:
नि:पक्षपातीपणा.
अहवाललेखन करताना लक्षात घ्यावयाच्या दोन बाबी सोदाहरण स्पष्ट करा.
पुढील विषयांवर अहवालाचे लेखन करा :
तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन.
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘अहवाल लेखनाची वैशिष्टये’ विशद करा:
अहवाल म्हणजे ______ सुस्पष्टता वस्तुनिष्ठता ______ विश्वसनीयता ______ विविध क्षेत्रांतील गरज.
अहवाललेखनाची कोणतीही दोन वैशिष्टये लिहा.
तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रमाविषयी अहवाललेखन करा.
अहवालाचा उद्देश ______ अहवाल लेखनात सुस्पष्टता व नीटनेटकेपणा ______ वृक्षारोपण कार्यक्रमाविषयी वस्तुनिष्ठता ______ त्यात विश्वसनीयता ______ कार्यक्रमाच्या प्रत्येक बिंदूला आवर्जून घेणे.
अहवाललेखन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी लिहा.
अहवाल लेखनाची उपयुक्तता लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे अहवालाची प्रमुख अंगे स्पष्ट करा.
प्रास्ताविक ______ अहवालाचा मध्य ______ अहवालाचा शेवट ______ अहवालाची भाषा ______ अहवालाची आवश्यकता.
अहवालाचे स्वरूप व आवश्यकता स्पष्ट करा.
हेतू, तारीख वेळ, समारोप विविध मुद्दे ______ आरंभ ते शेवट ______ क्रमाक्रमाने तपशील ______ माहिती संकलन ______ अहवाललेखनाची आवश्यकता.