Advertisements
Advertisements
Question
'सा विद्या या विमुक्तये' हे 'ब्रीदवाक्य' म्हणून वापरले जाते. प्रत्येक संस्थेला, शाळेला, मंडळाला आपले स्वत:चे असे ब्रीदवाक्य असते. अशी ब्रीदवाक्ये मिळवा. या ब्रीदवाक्यांचा अर्थ समजून घ्या.
Short Answer
Solution
- भारत सरकार -
ब्रीदवाक्य:- 'सत्यमेव जयते'
अर्थ:- सत्याचीच जीत होते. - विश्व विद्यालय अनुदान आयोग -
ब्रीदवाक्य: - 'ज्ञान - विज्ञान विमुक्तये'
अर्थ:- ज्ञान विज्ञानामुळे विमुक्ती प्राप्त होते. - थलसेना -
ब्रीदवाक्य:- 'सेवा अस्माकं धर्म'
अर्थ:- सेवा आपला धर्म आहे. - मुंबई पोलीस -
ब्रीदवाक्य:- 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'
अर्थ:- चांगल्या लोकांच्या रक्षणासाठी दृष्ट लोकांवर नियंत्रण ठेवणे. - श्रम मंत्रालय -
ब्रीदवाक्य: - 'श्रम एव जयते'
अर्थ:- श्रमाचा नेहमीच विजय होतो. - विद्या विनयेन् शोभते -
अर्थ:- ज्ञाना सोबतच विनम्रता हा गुण असेल तरच ज्ञान शोभून दिसते. - कमवा आणि शिका -
अर्थ:- मेहनत करून स्वतः मिळवलेल्या पैशाने स्वतःचे शिक्षण पूर्ण करणे. - शिका, संघटित व्हा, संघर्ष करा -
अर्थ:- शिक्षण घ्या. संघटित व्हा आणि एकोप्याने राहून अन्यायाविरुद्ध लढा. - न हि ज्ञानेन पवित्रम् इह वर्तते।
अर्थ:- मनुष्या जवळ जर ज्ञान असेल तर मनुष्य पवित्र (चांगले) वर्तन करू शकतो. - ज्ञानाचा प्रकाश, मतिचा विकास!
भरपूर ज्ञान मिळवल्यास माणसाचा विकास म्हणजे प्रगती होते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?