Advertisements
Advertisements
Question
शेजारील समांतरभुज चौकोनाच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(1) जर l(WZ) = 4.5 सेमी तर l(XY) = ?
(2) जर l(YZ) = 8.2 सेमी तर l(XW) = ?
(3) जर l(OX) = 2.5 सेमी तर l(OZ) = ?
(4) जर l(WO) = 3.3 सेमी तर l(WY) = ?
(5) जर m∠WZY = 120° तर m∠WXY = ? आणि m∠XWZ = ?
Solution
WXYZ हा समांतरभुज चौकोन आहे.
(1) l(XY) = l(WZ) = 4.5 सेमी ...(समांतरभुज चौकोनाच्या संमुख भुजा एकरूप असतात.)
(2) l(XW) = l(YZ) = 8.2 सेमी ...(समांतरभुज चौकोनाच्या संमुख भुजा एकरूप असतात.)
(3) l(OZ) = l(OX) = 2.5 सेमी ...(समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात.)
(4) l(WY) = 2 × l(WO) = 2 × 3.3 = 6.6 सेमी ...(समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात.)
(5) m∠WXY = m∠WZY = 120º ...(समांतरभुज चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात.)
आता,
m∠WZY + m∠XWZ = 180º ...(समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या जोड्या परस्परपूरक असतात.)
⇒ 120º + m∠XWZ = 180º
⇒ m∠XWZ = 180º − 120º = 60º