Advertisements
Advertisements
Question
शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या?
Answer in Brief
Solution
शीतयुद्धाची अखेर होण्यास खालील बाबी कारणीभूत ठरल्या.
- सोव्हिएत रशियाने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले. राज्याचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल केले.
- सोव्हिएत रशियाचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी ‘पेरेस्त्रोईका’ (पुनर्रचना) आणि ग्लासनोस्त (खुलेपणा) ही धोरणे अमलात आणली. या धोरणांमुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले. राजकीय व आर्थिक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण बदल झाले. म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली.
- पूर्व युरोपमधील सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखालील देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या.
- सोव्हिएत रशियाचे विघटन झाले व त्यातून अनेक नवी स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. रशिया हा सोव्हिएत रशियामधील सर्वांत मोठा देश होता.
shaalaa.com
शीतयुद्धाचा शेवट
Is there an error in this question or solution?