Advertisements
Advertisements
Question
शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले?
Answer in Brief
Solution
शीतयुद्ध संपल्यानंतर जागतिक राजकारणात जे मोठे बदल झाले ते पुढीलप्रमाणे आहेत.
- जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली.
- भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रसार झाला. लोकांमधील विचार-कल्पनांचाही मुक्त संचार होऊ लागला.
- सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचे ठरवल्याने अन्य राष्ट्रांना ‘मदत’ करण्याची कल्पना मागे पडली. त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले.
- संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या जबाबदारीत वाढ झाली. जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहेत.
- पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री-पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झाले.
shaalaa.com
शीतयुद्धानंतरचे जग
Is there an error in this question or solution?