Advertisements
Advertisements
Question
सर्वच ग्रामीण वस्तींचे रूपांतर नागरी वस्तीत होतेच असे नाही.
Solution
ग्रामीण वस्तीचे स्थान हे प्रामुख्याने प्राकृतिक घटकांवर अवलंबून असते. जेव्हा ग्रामीण वस्ती विकसित होते, तेव्हा भौगोलिक अनुकूलता या घटकास प्राधान्य दिल्यामुळे पर्वत पायथा, कृषिजमीन, पाण्याची उपलब्धता हे घटक जास्त प्रमाणात विचारात घेतले जातात. साहजिकच तेथे कृषी व कृषिसंबंधित आर्थिक व्यवसाय चालताना दिसतात. थोडक्यात, ग्रामीण भूमी उपयोजनाचा बराचसा भाग हा शेती व्यवसायाशी निगडित असतो. अशा वस्तीत इतर व्यवसायांचा विकास फारच संथ गतीने होतो. उद्योग आधारित द्वितीयक व्यवसाय आणि सेवा आधारित तृतीयक व्यवसाय या विकासाची वाढ व्यवस्थित होत नाही. अशा वस्तीची लोकसंख्या वाढ ही मर्यादित असते. अशा वस्तीच्या वाढीवरही मर्यादा असतात. कारण स्थानिक साधनसंपत्तीची कमतरता असते. अशा वेळेस त्या ग्रामीण वस्तीचे रूपांतर नागरी वस्तीत होईलच असे नसते.