Advertisements
Advertisements
Question
स्वमत लिहा.
'स्वत:चे हात वापर की कचरा काढायला' लेखकांच्या आईच्या या उपदेशातून तुम्ही काय शिकाल? सोदाहरण लिहा.
Short Answer
Solution
दुसऱ्यांना उपदेश करून सांगितलेली कामे कधीच पार पडत नाहीत. मात्र शाळेत काही कार्यक्रम असेल तेव्हा आमचे चव्हाण सर कोणाला काहीही सांगत नाहीत. तेच सतरंजीचे एक टोक उचलतात आणि पसरायला सुरुवात करतात. मग काय सर्व मुले धावतात. मग ते चार-पाच मुलांना सतरंजी उपसरण्याचे काम वाटून देतात. टेबल-खुर्ची पुसायची असेल तर फडका घेतात आणि सुरुवात करतात. अशा प्रकारे चव्हाण सर न बोलता काम करून घेतात, म्हणूनच लेखकांच्या आईचा उपदेश मला खूप पटतो. बोलण्यापेक्षा कृतीचा प्रभाव जास्त पडतो, हेच खरे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?