Advertisements
Advertisements
Question
टीपा लिहा.
मानवी मेंदू
Answer in Brief
Solution
- मेंदूची रचना अतिशय नाजूक परंतु अत्यंत विकसित अशी आहे. मेंदू हा चेतासंस्थेचा प्रमुख असा नियंत्रण करणारा भाग असून डोक्याच्या कवटीमध्ये म्हणजेच कर्परेमध्ये तो संरक्षित असतो. मेरुरज्जूला कशेरूस्तंभाचे/पाठीच्या कण्याचे संरक्षण मिळते. नाजूक मध्यवर्ती चेतासंस्था व त्यावरील अस्थी (हाडे) यांच्या दरम्यानच्या पोकळीत संरक्षण करणारी मस्तिष्क आवरणे असतात. मेंदूच्या विविध भागातील पोकळ्यांना मस्तिष्क निलये तर मेरुरज्जूमधील लांब पोकळीला मध्यनाल म्हणतात. मस्तिष्क निलये, मध्यनाल व मस्तिष्क आवरणांमधील पोकळ्यांमध्ये प्रमस्तिष्क-मेरुद्रव असतो. हा द्रव मध्यवर्ती चेतासंस्थेस पोषकद्रव्ये पुरवतो तसेच आघातांपासून तिचे संरक्षणही करतो.
- प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन सुमारे 1300 ते 1400 ग्रॅम इतके असून तो सुमारे 100 अब्ज चेतापेशींचा बनलेला असतो. मेंदूचे तीन महत्त्वाचे भाग आहेत. ते पुढीलप्रमाणे: प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क आणि मस्तिष्कपुच्छ.
- प्रमस्तिष्क: हा मेंदूचा सर्वात मोठा भाग असून तो दोन प्रमस्तिष्क गोलार्धांचा बनलेला असतो. हे गोलार्ध टणक तंतू आणि चेतामार्ग यांनी एकमेकांना जोडलेले असतात. प्रमस्तिष्काचा बाहेरील पृष्ठभाग हा अनियमित वळ्या व खाचा यांनी बनलेला असतो. त्यांना संवलन असे म्हणतात. यामुळे प्रमस्तिष्काच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढते व चेतापेशींसाठी भरपूर जागा मिळते.
प्रमस्तिष्काची कार्ये: ऐच्छिक हालचालींचे नियंत्रण, मनाची एकाग्रता, नियोजन, निर्णयक्षमता, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता व बुद्धिविषयक क्रिया. - अनुमस्तिष्क: हा मेंदूचा छोटा भाग असून, कर्परगुहेच्या (कवटीच्या) मागील बाजूस तर प्रमस्तिष्काच्या खालील बाजूस असतो. याचा पृष्ठभाग वळ्यांऐवजी उंचवटे व खळगे या स्वरूपांत असतो.
अनुमस्तिष्काची कार्ये:
1. ऐच्छिक हालचालींमध्येसुसूत्रता आणणे.
2. शरीराचा तोल सांभाळणे. - मस्तिष्कपुच्छ: हा मेंदूचा सर्वात शेवटचा किंवा पुच्छबाजूचा भाग असून याच्या वरील बाजूस दोन त्रिकोणाकृती उंचवट्यासारख्या संरचना असतात. त्यांना पिरॅमिड म्हणतात. याच्या पश्चभागाचे पुढे मेरुरज्जूत रुपांतर होते.
मस्तिष्कपुच्छाची कार्ये: हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छ्वास, शिंकणेे, खोकणे, लाळ निर्मिती इत्यादी अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण.
shaalaa.com
मानवी मेंदू : रचना
Is there an error in this question or solution?