English

त्रिकोणाच्या तीन कोनांची मापे अंकगणिती श्रेढरीमध्ये आहेत. सर्वांत लहान कोनाचे माप साधारण फरकाच्या पाचपट आहे, तर त्या त्रिकोणाच्या तीनही कोनांची मापे काढा. (त्रिकोणाच्या कोनांची मापे a, a + d, - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

त्रिकोणाच्या तीन कोनांची मापे अंकगणिती श्रेढरीमध्ये आहेत. सर्वांत लहान कोनाचे माप साधारण फरकाच्या पाचपट आहे, तर त्या त्रिकोणाच्या तीनही कोनांची मापे काढा. (त्रिकोणाच्या कोनांची मापे a, a + d, a + 2d घ्या.)

Sum

Solution

समजा, त्रिकोणाच्या तीन कोनांची मापे अंकगणिती श्रेढीत अनुक्रमे a, a + d, a + 2d, आहेत.

येथे a = पहिले पद, d = साधारण फरक

त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज 180° असते.

∴ a + a + d + a + 2d = 180°

∴ 3a + 3d = 180°

∴ a + d = `180^circ/3`

∴ a + d = 60°  ...(i)

दिलेल्या अटीनुसार, सर्वांत लहान कोनाचे माप साधारण फरकाच्या पाचपट आहे.

∴ a = 5d

a = 5d समीकरण (i) मध्ये ठेवून,

5d + d = 60°

∴ 6d = 60°

∴ d = `60^circ/6` = 10°

∴ a = 5d = 5(10°) = 50°

a + d = 50° + 10° = 60°

a + 2d = 50° + 2(10°)

= 50° + 20°

= 70°

∴ त्रिकोणाच्या तीनही कोनांची मापे 50°, 60° व 70° आहेत.

shaalaa.com
अंकगणिती श्रेढीतील पहिल्या n पदांची बेरीज
  Is there an error in this question or solution?
2021-2022 (March) Set 1

RELATED QUESTIONS

एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद 6 व सामान्य फरक 3 आहे तर S27 काढा.

a = 6, d = 3, S27 = ?

`"S"_"n" = "n"/2 [square + ("n" - 1)"d"]`

`"S"_27 = 27/2 [12 + (27 - 1)square]`

`= 27/2 xx square`

= 27 × 45 = `square`


पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा.


एका अंकगणिती श्रेढीचे 19 वे पद 52 आणि 38 वे पद 128 आहे, तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा.


एका अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे, तर तिचे 28 वे पद काढा.


जर अंकगणिती श्रेढीतील पहिल्या p पदांची बेरीज ही पहिल्या q पदांच्या बेरजेबरोबर असेल, तर त्यांच्या पहिल्या (p + q) पदांची बेरीज शून्य असते हे दाखवा. (p ≠ q).


4 ने भाग जाणाऱ्या तीन अंकी नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा.


1 ते 50 मधील सर्व विषम संख्यांची बेरीज करा.


1 ते 140 मधील 4 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज करा.


मनीष आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षांपूर्वी मनीषचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघांची आजची वये काढा.


ज्या अंकगणिती श्रेढीत पहिले पद p आहे, दुसरे पद q आहे आणि शेवटचे पद r आहे तर त्या श्रेढीतील सर्व पदांची बेरीज `("q" + "r" - 2"p") xx (("p" + "r"))/(2("q"-"p"))` एवढी आहे हे दाखवा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×