English

उद्योजकाची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

Question

उद्योजकाची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

Answer in Brief

Solution

उद्योजकांकडे काही विशेष वैशिष्ट्ये असतात, जसे की, सर्जनशील विचारसरणी, कल्पनाशक्ती, उत्साह, प्रामाणिकपणा इ. 

  1. बौद्धिक क्षमता: एक उद्योजक एक सर्जनशील विचारवंत असतो. त्याच्याकडे चांगली बुध्दिमत्ता असते. त्याच्याकडे व्यवसायाच्या परिस्थितीचे विश्लेषण करण्याची क्षमता असते. ह्या क्षमतेचा उपयोग त्यांना योग्य निर्णय घेण्यास होतो.
  2. भविष्यातील दुरदृष्टी: बाजाराच्या परिस्थितीबद्दल उद्योजकांना भविष्यातील दूरदृष्टी असते. व्यवसायाच्या बाह्य वातावरणाबद्दलही त्यांना ज्ञान असायला पाहिजे. त्यामुळे त्यांना परिस्थिती व बाजारातील बदलानुसार योग्य निर्णय घेण्यास मदत होते. ते वेळेवर कार्यवाही करू शकतात.
  3. कठोर परिश्रम: उद्योजक कठोर परिश्रम करण्यास तयार असतात. जेव्हा नवीन उपक्रम सुरू होतो तेव्हा ते जास्त महत्त्वाचे असते. त्यांना जास्त वेळ काम करावे लागते. अनेक वेळा व्यवसायाची क्षेत्रे स्वतंत्रपणे हाताळावी लागतात. यामुळे त्यांना यशस्वी होण्यास नक्कीच मदत होते.
  4. तांत्रिक ज्ञान: उद्योजकास त्याच्या व्यवसायाबद्दल चांगले तांत्रिक ज्ञान असते. उद्योजकामध्ये उत्पादन, उत्पादन प्रकिया आणि तंत्रज्ञानाबद्दल अधिक ज्ञान मिळवून स्वतःला अद्ययावत ठेवण्याची क्षमता असते.
  5. संज्ञापन कौशल्ये: ग्राहक, पुरवठादार, धनको, कर्मचारी इ. विविध प्रकारच्या व्यक्तींशी संवाद साधण्याची उद्योजकास आवश्यकता असते. तो आपले मत, कल्पना आणि रणनीती प्रभावीपणे व्यक्त करण्यास सक्षम असावा. तेथे संदेश पाठविणारा आणि संदेश स्वीकारणारा यामध्ये समन्वय असणे आवश्यक आहे.
  6. उच्च आशावादी: उद्योजकाने नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. अपयशाच्या काळातही बाजाराच्या परिस्थितीबद्दल त्याने नेहमीच आशावाद आणि आत्मविश्वास बाळगावा अशी सकारात्मक वृत्ती त्यांना आपला व्यवसाय यशस्वीरित्या चालविण्यास मदत करते.
  7. जोखीम घेणे: यशस्वी व्यावसायिक व्यवसायातील एकूण जोखीम स्वीकारतो. तो आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार असतो आणि नेहमीच नवीन आणि अधिकाधिक संधीच्या शोधात असतो.
  8. आत्मविश्वास: उद्योजकामध्ये आत्मविश्वास असतो. तसेच ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक इच्छा असते. अशा आत्मप्रेरणेमुळे त्यांना विविध अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी दृढ आत्मविश्वास मिळतो.
shaalaa.com
उद्योजकाची वैशिष्ट्ये (Characteristics of an Entrepreneur)
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×