English

विद्युतप्रवाह निर्माण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? आकृतीसह वर्णन करा. अ. विद्युतचलित्र ब. गॅल्व्हॅनोमीटर क. विद्युतजनित्र (दिष्ट) ड. व्होल्टमीटर - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

विद्युतप्रवाह निर्माण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? आकृतीसह वर्णन करा.

Options

  • विद्युतचलित्र

  • गॅल्व्हॅनोमीटर

  • विद्युतजनित्र (दिष्ट)

  • व्होल्टमीटर

MCQ
Answer in Brief

Solution

दिष्ट जनित्र : आकृती मध्ये दिष्ट विद्युतधारा जनित्राची (DC जनरेटर) रचना दाखवली आहे.

ABCD : तांब्याच्या तारेचे आयताकृती कुंडल; N, S : चुंबकाचे ध्रुव; R1, R2 : दुभंगलेल्या कड्याचे भाग, B1 : B2 : कार्बन ब्रशेस 

कार्य  : आस बाहेरील यंत्राच्या मदतीने फिरवला जातो. जेव्हा दिष्ट जनित्राचे कुंडल चुंबकीय क्षेत्रामध्ये स्वत:भोवती फिरते तेव्हा ते चुंबकीय बल रेषांना छेदते. अशा प्रकारे बदलत जाणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे कुंडलामध्ये विद्युत विभवांतर निर्माण होतो. त्यामुळे कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. प्रकाशमान बल्ब किंवा गॅल्व्हॅनोमीटर ही विद्युतधारा दर्शवतो. विद्युतधारेची दिशा कुंडलाच्या परिवलनाच्या दिशेवर अवलंबून असते.
या जनित्रामध्ये एक कार्बन ब्रश सतत कुंडलाच्या ऊर्ध्व दिशेने कार्यरत असलेल्या भुजेच्या संपर्कात असतो, तर दुसरा ब्रश सतत कुंडलाच्या खालच्या दिशेने कार्यरत असलेल्या भुजेच्या संपर्कात असतो. परिणामी जोपर्यंत कुंडल चुंबकीय क्षेत्रात फिरत असते, तोपर्यंत विद्युतधारा परिपथात एकाच दिशेने प्रवाहित होते. तसेच कुंडल चुंबकीय क्षेत्रात फिरत असेपर्यंतच विद्युतधारा निर्माण होत असते. येथे विद्युतधारेचे परिमाण मात्र सतत बदलत असते. या बाबतीत ही विद्युत धारा विद्युत घट पासून मिळणाऱ्या विद्युतधारेपेक्षा वेगळी असते.

shaalaa.com
प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा (Alternating Current (AC) and Direct Current (DC))
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: विद्युतधारेचे परिणाम - स्वाध्याय [Page 60]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 4 विद्युतधारेचे परिणाम
स्वाध्याय | Q ५. | Page 60
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×