Advertisements
Advertisements
Question
विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
Solution
विज्ञानाचे प्रमुख कार्य म्हणजे सृष्टीची रहस्ये उलगडणे, त्यातील संगती जाणणे आणि मानवी जीवनाच्या विकासासाठी त्याचा वापर करणे. याकरता बुद्धिमत्ता आवश्यक असतेच; मात्र यासोबतच प्रयत्न, चिकाटीही महत्त्वाची असते. तर्क लावण्याची क्षमता, जिज्ञासा, दृष्टिकोन या गोष्टींचा पाठपुरावा करण्याची सवय, संयम हे गुणही गरजेचे असतात.
बरेचसे मोठे शास्त्रज्ञ हे सर्वसामान्य बुद्धिमत्तेचे होते; मात्र नंतर आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून अनेक शोधांचे जनक बनलेले दिसतात. त्यांच्याठायी असणाऱ्या जिज्ञासू वृत्तीमुळेच ते नवे शोध लावतात. येणाऱ्या अपयशाला पचवून ध्येयाकडे वाटचाल करताना दिसतात, आपल्या कार्यातील, प्रयत्नांतील सातत्याने यशाची नवी शिखरेही गाठताना दिसतात. त्यामुळे, केवळ बौद्धिक, पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून त्याच्या बरोबरीने वैज्ञानिक दृष्टी, चिकाटी, प्रयत्नांची पराकाष्ठा, अपयश पचवण्याची व त्यातून उभारी घेण्याची वृत्ती महत्त्वाची ठरते व तीच नव्या शोधांना जन्म देते एवढे निश्चित.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते.
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: शिरीषला वारंवार खेद वाटायचा.
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे असावी म्हणून उठाव करणारे-
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
सरळमार्गी -
आकृतिबंध पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.
तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?
‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी माझ्या जवळची होती. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)
फरक स्पष्ट करा.
दक्षिणेतील हवामान | उत्तरेतील हवामान |
(१) | (१) |
(२) | (२) |
(३) | (३) |
कारणे लिहा.
हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....
चौकट पूर्ण करा.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले.
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
हव्याशा क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली.
तुमच्या मते दिव्यांग मुलांना भाषाशिक्षणात येणारे संभाव्य अडथळे लिहा.
‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.