हिंदी

विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्‍धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्‍धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

विज्ञानाचे प्रमुख कार्य म्हणजे सृष्टीची रहस्ये उलगडणे, त्यातील संगती जाणणे आणि मानवी जीवनाच्या विकासासाठी त्याचा वापर करणे. याकरता बुद्धिमत्ता आवश्यक असतेच; मात्र यासोबतच प्रयत्न, चिकाटीही महत्त्वाची असते. तर्क लावण्याची क्षमता, जिज्ञासा, दृष्टिकोन या गोष्टींचा पाठपुरावा करण्याची सवय, संयम हे गुणही गरजेचे असतात.

बरेचसे मोठे शास्त्रज्ञ हे सर्वसामान्य बुद्धिमत्तेचे होते; मात्र नंतर आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून अनेक शोधांचे जनक बनलेले दिसतात. त्यांच्याठायी असणाऱ्या जिज्ञासू वृत्तीमुळेच ते नवे शोध लावतात. येणाऱ्या अपयशाला पचवून ध्येयाकडे वाटचाल करताना दिसतात, आपल्या कार्यातील, प्रयत्नांतील सातत्याने यशाची नवी शिखरेही गाठताना दिसतात. त्यामुळे, केवळ बौद्धिक, पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून त्याच्या बरोबरीने वैज्ञानिक दृष्टी, चिकाटी, प्रयत्नांची पराकाष्ठा, अपयश पचवण्याची व त्यातून उभारी घेण्याची वृत्ती महत्त्वाची ठरते व तीच नव्या शोधांना जन्म देते एवढे निश्चित.

shaalaa.com
गद्य (9th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: दिव्याच्या शोधामागचे दिव्य - स्वाध्याय [पृष्ठ २५]

APPEARS IN

बालभारती Marathi 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य
स्वाध्याय | Q ४. (२) | पृष्ठ २५

संबंधित प्रश्न

शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.


आकृतिबंध पूर्ण करा.


वाक्य पूर्ण करा.

रेल्वे असावी म्हणून उठाव करणारे-


वाक्य पूर्ण करा.

इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________


वाक्य पूर्ण करा.

घाट उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे -


खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

फुकट - 


तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.


खालील आकृतिबंध पूर्ण करा.


वाक्य पूर्ण करा.

पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा -


सूचनेप्रमाणे कृती करा.

वाळे अडवलेले पक्षी मोकळे सोडले जातात. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.)


कारणे लिहा.

लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....


कारणे लिहा.

पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते, कारण....


‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.


चूक की बरोबर ते लिहा.

परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती.


खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.

परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.


समर्पक उदाहरण लिहा.

खेळातसुद्धा जातपात मानली जात असे.


‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


फरक स्पष्ट करा.


‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×