Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
उत्तर
नाण्याला नेहमी दोन बाजू असतात त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे फायदे व तोटे अशा दोन बाजू असतात. रेल्वेप्रवासाच्या फायद्यांचा विचार केला, तर सर्वांत स्वस्त, वेगवान व वाहतुकीची प्रचंड क्षमता असणारा हा मार्ग आहे. रेल्वेमुळे केवळ प्रवाशांचीच नव्हे, तर मालाची वाहतूक करणेही सोपे होते. लांब पल्ल्याच्या रेल्वेत तर खानपानाची, प्रसाधनगृहांची, झोपण्याची सोय असल्याने हा मार्ग अत्यंत सुखावह आहे. रेल्वेमुळे देशाला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते.
फायद्यांबरोबरच रेल्वे प्रवासाचे काही तोटेही आहेत. रेल्वेमार्गाचे जाळे निर्माण करणे अत्यंत कठीण व खर्चिक काम आहे. त्यांच्या डागडुजीसाठीही प्रचंड प्रमाणात खर्च येतो. डोंगराळ भागांमध्ये रेल्वे मार्गांची उभारणी शक्य होत नाही. अशा भागांत रेल्वे गाड्यांचे अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी होते. या जाळ्यांद्वारे सर्वच ठिकाणे जोडणे शक्य होत नाही. याशिवाय, महानगरांमधील रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या, प्रचंड गर्दी, अनियमित गाड्या आणि जीवितास धोका या बाबींना प्रवाशांना रोज सामोरे जावे लागते. असे जरी असले तरी रेल्वेशिवाय भारताची कल्पना करणे शक्यच नाही.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.
आकृतिबंध पूर्ण करा.
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे असावी म्हणून उठाव करणारे-
वाक्य पूर्ण करा.
घाट उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
मुनीम -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
आश्चर्य -
कारणे लिहा.
रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.
योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
प्लेटिनमचा प्रयोग ______ होता.
आकृती पूर्ण करा.
तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?
‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
सहसंबंध शोधा.
अंधार : तम : : किल्ली : ______
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्धतीचा घटनाक्रम लिहा.
स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातींतील पक्ष्यांचे साम्यघटक लिहा.
वाक्य पूर्ण करा.
आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी-
कारणे लिहा.
लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....
चूक की बरोबर ते लिहा.
इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले.
‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.