English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.

Answer in Brief

Solution

नाण्याला नेहमी दोन बाजू असतात त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे फायदे व तोटे अशा दोन बाजू असतात. रेल्वेप्रवासाच्या फायद्यांचा विचार केला, तर सर्वांत स्वस्त, वेगवान व वाहतुकीची प्रचंड क्षमता असणारा हा मार्ग आहे. रेल्वेमुळे केवळ प्रवाशांचीच नव्हे, तर मालाची वाहतूक करणेही सोपे होते. लांब पल्ल्याच्या रेल्वेत तर खानपानाची, प्रसाधनगृहांची, झोपण्याची सोय असल्याने हा मार्ग अत्यंत सुखावह आहे. रेल्वेमुळे देशाला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. 

फायद्यांबरोबरच रेल्वे प्रवासाचे काही तोटेही आहेत. रेल्वेमार्गाचे जाळे निर्माण करणे अत्यंत कठीण व खर्चिक काम आहे. त्यांच्या डागडुजीसाठीही प्रचंड प्रमाणात खर्च येतो. डोंगराळ भागांमध्ये रेल्वे मार्गांची उभारणी शक्य होत नाही. अशा भागांत रेल्वे गाड्यांचे अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी होते. या जाळ्यांद्वारे सर्वच ठिकाणे जोडणे शक्य होत नाही. याशिवाय, महानगरांमधील रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या, प्रचंड गर्दी, अनियमित गाड्या आणि जीवितास धोका या बाबींना प्रवाशांना रोज सामोरे जावे लागते. असे जरी असले तरी रेल्वेशिवाय भारताची कल्पना करणे शक्यच नाही.

shaalaa.com
गद्य (9th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 4.1: जी. आय. पी. रेल्वे - स्वाध्याय [Page 14]

APPEARS IN

Balbharati Marathi 9 Standard Maharashtra State Board
Chapter 4.1 जी. आय. पी. रेल्वे
स्वाध्याय | Q ६. (इ) | Page 14

RELATED QUESTIONS

आकृतिबंध पूर्ण करा.


वाक्य पूर्ण करा.

इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________


स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.


______ या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.


योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.

फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे ______ वाचतात.


तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?


विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्‍धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.


खालील मुद्‌द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.

करारीपणा


खालील मुद्‌द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.

आजीचा गोतावळा


‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.


खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.

दुर्घट- 


'कुलूप' या पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.


सहसंबंध शोधा.

रमेश : नाम : : ते : ______


पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवनपद्‍धतीसंबंधी तुमची मते सविस्तर लिहा.


तुम्हांला पक्षिमित्र बनायला आवडेल काय ? तुमचे मत सकारण लिहा.


कारणे लिहा.

पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते, कारण....


पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्‌द्यांच्या आधारे तुलना करा.

  जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंब
मुद्दा कुटुंब क्र. १ कुटुंब क्र. २
परसदार    
माणसे    
स्त्रिया    
पाणी जमीन    
हिरवा आनंद    

चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.

हिरमुसले होणे  

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×