Advertisements
Advertisements
Question
वृत्तचिती व शंकू समान तळाचे आहेत. वृत्तचितीवर शंकू ठेवला. वृत्तचिती भागाची उंची 3 सेमी असून तळाचे क्षेत्रफळ 100 चौसेमी आहे. जर संपूर्ण घनाकृतीचे घनफळ 500 घसेमी असेल तर संपूर्ण घनाकृतीची उंची काढा.
Solution
दिलेले: वृत्तचिती भागासाठी,
उंची (h) = 3 सेमी,
तळाचे क्षेत्रफळ (πr2) = 100 सेमी2
संपूर्ण घनाकृतीचे घनफळ = 500 सेमी3
शोधा: संपूर्ण घनाकृतीची उंची
उकल:
वृत्तचिती व शंकू समान तळाचे आहेत.
∴ त्यांच्या त्रिज्या समान आहेत.
वृत्तचितीची त्रिज्या = शंकूची त्रिज्या = r
तळाचे क्षेत्रफळ = 100 सेमी2
∴ πr2 = 100 ..........(i)
शंक्वाकृती भागाची उंची H मानू.
संपूर्ण आकृतीचे घनफळ = वृत्तचितीचे घनफळ + शंकूचे घनफळ
∴ `500 = pir^2h + 1/3pir^2H`
∴ 500 = `pir^2(h + H/3)`
∴ 500 = 100`(3 + H/3)` ...........[(i) वरून]
∴ `3 + H/3 = 500/100`
∴ `3 + H/3 = 5`
∴ `H/3 = 5 - 3`
∴ `H/3 = 2`
∴ H = 6 सेमी
∴ शंक्वाकृती भागाची उंची (H) = 6 सेमी
संपूर्ण घनाकृतीची उंची = h + H
= 3 + 6
= 9 सेमी
∴ संपूर्ण घनाकृतीची उंची 9 सेमी आहे.