Advertisements
Advertisements
Question
व्युत्पत्ती कोश आजच्या युगात किती आवश्यक आहे ते उदाहरणे देऊन सांगा.
Solution
व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे हे व्युत्पत्ती कोशाचे कार्य होय. प्रारंभीची भाषा काळाच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत गेली. आताचे तिचे स्वरूप पूर्वीच्या भाषेहून पूर्णपणे भिन्न आहे. हे परिवर्तन लक्षात घेण्याकरता, शब्दांच्या निर्मितीमागील रहस्य शोधण्याकरता, त्या शब्दांमागील अर्थांचे पदर उलगडण्याकरता, भाषेचा आनंद घेण्याकरता व भाषा सखोलपणे आत्मसात करण्याकरता व्युत्पत्ती कोशाची आजच्या युगात आवश्यकता भासते. भाषेतील बदलत गेलेल्या शब्दांचे मूळ आपल्याला व्युत्पत्ती कोशाच्या माध्यमातून शोधता येते. उदाहरणार्थ, मराठी भाषेतील 'आग' हा शब्द संस्कृतमधील 'अग्नि' या शब्दापासून आला आहे.
काळानुसार, शब्दांच्या स्वरूपात, अर्थात व त्यांच्या परस्परसंबंधांत बदल होतात. काहीवेळा मूळ अर्थासोबतच अधिकचा एखादा अर्थ त्या भाषेत रूढ होतो. उदा. व्युत्पत्ती कोशानुसार शहाणा म्हणजे हुशार, बुद्धिमान; पण सध्या 'शहाणा' म्हणजे 'अतिशहाणा' हा अर्थदेखील रूढ होत आहे. समान दिसणाऱ्या शब्दांचे वेगवेगळे अर्थदेखील व्युत्पत्ती कोशातून उलगडतात. उदा. पाठ. शरीराचा अवयव किंवा पुस्तकातील धडा.
एखाद्या शब्दांचे मूळ रूप, त्याचा इतिहास, अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे हेही व्युत्पत्ती कोशात दाखवलेले असते. उदा. दीपावली हा मूळ संस्कृत शब्द; मराठीत त्याचा दिवाळी हा शब्द बनला आहे.
भाषेत बदल होण्यामागे बहुतेकदा सुलभीकरणाची म्हणजेच सोपे करण्याची प्रवृत्ती असते किंवा कोणत्याही दोन भाषा बोलणारे भाषिक एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होते. या सर्व बदलांमागच्या कारणांची नोंद व्युत्पत्ती कोशात असल्याने भाषाभ्यास करताना व्युत्पत्ती कोशाची आवश्यकता भासते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
टीप लिहा.
व्युत्पत्ती कोशाचे कार्य
पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.
टिपा लिहा.
शब्द तयार होण्याचे विविध प्रकार
खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)
पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.
शब्द अनेक, अर्थ एक | व्युत्पत्ती कोश | शब्द एक, अर्थ अनेक |
उदा., जल, नीर, तोय... - पाणी | उदा., पान - पान - झाडाचे पान (पर्ण) पान - पुस्तकाचे पान (पृष्ठ) |
व्युत्पत्ती कोश या पाठाच्या आधारे शब्दांचे विविध अर्थ व समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ याविषयी सविस्तर लिहा.
टिपा लिहा.
व्युत्पत्ती कोशाची निर्मिती
टिपा लिहा.
व्युत्पत्ती कोश
व्युत्पत्ती कोश पाहण्यासाठीची पद्धत सोदाहरणासहित सांगा.
पुढील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा.
व्युत्पत्ती कोश | ||
निर्मितीचा ठराव | निर्मितीची जबाबदारी | निर्मितीसाठी अर्थसाहाय्य |
व्युत्पत्ती कोश कसा पाहावा ते स्पष्ट करा.