Advertisements
Advertisements
Question
योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला, तर तो इस्पिकचा असणे या घटनेची संभाव्यता काढा.
Solution
एकूण 52 पत्ते आहेत.
∴ n(S) = 52
समजा, घटना B: काढलेला पत्ता इस्पिकचा असणे.
एकूण 13 इस्पिकचे पत्ते आहेत.
∴ n(B) = 13
∴ P(B) = `("n"("B"))/("n"("S")) = 13/52`
∴ P(B) = `1/4`
APPEARS IN
RELATED QUESTIONS
प्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे 1 ते 36 या संख्या लिहून तयार केलेली 36 कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर पुढील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा.
i) काढलेल्या कार्डावरील संख्या पूर्ण वर्ग असणे.
ii) काढलेल्या कार्डावरील संख्या मूळ संख्या असणे.
iii) काढलेल्या कार्डावरील संख्या 3 ची विभाज्य संख्या असणे.
अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
ती संख्या विषम असेल.
बास्केटबॉल खेळाडू जॉन, वासिम व आकाश एका ठरावीक जागेवरून बास्केटमध्ये बॉल टाकण्याचा सराव करत होते. बास्केटमध्ये बॉल पडण्याची जॉनची संभाव्यता `4/5`, वसीमची 0.83 व आकाशची 58% आहे, तर कोणाची संभाव्यता सर्वांत जास्त आहे?
एका खोक्यात 5 लाल पेनं, 8 निळी पेनं आणि 3 हिरवी पेनं आहेत. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला एक पेन काढायचे आहे, तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा.
0, 1, 2, 3, 4 यांपैकी अंक घेऊन दोन अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती केलेली चालेल, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
ती संख्या 4 च्या पटीत असणे.
एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून 1 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेला चेंडू लाल असणे.
एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून 1 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेला चेंडू लाल नसणे.
योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी कृती पूर्ण करा.
घटना A : काढलेला पत्ता एक्का मिळणे.
घटना B : काढलेला पत्ता इस्पिकचा मिळणे.
कृती:
समजा, नमुना अवकाश 'S' आहे.
∴ n(S) = 52
घटना A : काढलेला पत्ता एक्का मिळणे.
∴ n(A) = `square`
∴ P(A) = `square` ...........(सूत्र)
∴ P(A) = `square/52`
∴ P(A) = `square/13`
घटना B : काढलेला पत्ता इस्पिकचा मिळणे.
∴ n(B) = `square`
P(B) = `("n"("B"))/("n"("S"))`
∴ P(B) = `square/4`
एका पिशवीत 8 लाल व काही निळे चेंडू आहेत. पिशवीतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता लाल व निळा चेंडू मिळण्याची संभाव्यता यांचे गुणोत्तर 2 : 5, आहे, तर पिशवीतील निळ्या चेंडूंची संख्या काढा.
एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा:
घटना B: काटा व विषम संख्या मिळणे अशी आहे.