Advertisements
Advertisements
सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
Concept: जाता अस्ताला
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) योग्य पर्याय निवडा. (2)
(1) सैनिकाचे औक्षण केले जाते ______.
(i) भरलेल्या अंतःकरणाने
(ii) डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी
(iii) तबकातील निरांजनाने
(iv) भाकरीच्या तुकड्याने
(2) कवितेतील ‘दीनदुबळे’ म्हणजे ______.
(i) कष्टाचे, पैशाचे सामर्थ्य नसलेले
(ii) सैनिकाबरोबर लढणारे
(iii) शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेले
(iv) सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय
नाही मुठीमध्ये द्रव्य जीव ओवाळावा तरी वर घोंघावे बंबारा, तुझी विजयाची दौड अशा असंख्य ज्योतींची |
(2) कृती करा: (2)
- डोळे भरून पाहावे असे दृश्य -
- अपुरे वाटणारे सामर्थ्य -
(3) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा: (2)
- औक्षण -
- द्रव्य -
- शौर्य -
- आसवे -
(4) काव्यसौंदर्य: (2)
‘अशा असंख्य ज्योतींची
तुझ्यामागून राखण’
या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
Concept: औक्षण
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | ‘औक्षण’ |
(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
(२) कवितेचा रचनाप्रकार - | |
(३) कवितेचा काव्यसंग्रह - | |
(४) कवितेचा विषय - | |
(५) कवितेतील आवडलेली ओळ - | |
(६) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे - |
Concept: औक्षण
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) चौकटी पूर्ण करा. (2)
- डोळे भरून पहावी अशी - ______
- मुठीमध्ये नसलेले - ______
नाही मुठीमध्ये द्रव्य काय करावें कळेना जीव ओवाळावा तरी तुझ्या शौर्यगाथेपुढे वर घोंघावे बंबारा, धडाडत्या तोफांतून तुझी विजयाची दौड डोळ्यांतील आसवांची अशा असंख्य ज्योतींची दीनदुबळ्यांचे असें |
(2) एका वाक्यात उत्तरे लिहा. (2)
- कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते?
- सैनिकांचे पाऊल जिद्दीचे का वाटते?
(3) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. (2)
- द्रव्य -
- आसवे -
- औक्षण -
- कल्लोळ -
(4) ‘सैनिक सीमेवर तैनात असतो म्हणून आपण सुरक्षित राहतो’, या विधानातील भाव स्पष्ट करा. (2)
Concept: औक्षण
‘निसर्ग हा मोठा जादूगर आहे’, हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते, ते ‘जगणं कॅक्टसचं’ या पाठाच्या आधारे सविस्तर लिहा.
Concept: जगणं कॅक्टसचं
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
झाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत... पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग रक्त होते क्षणभर हिरवेगार आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत झाडाचे बाहु सरसावलेले असतात मुसाफिराना कवेत घेण्यासाठी पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणे दडलेले असते हसावं कसं सळसळत्या पानासारखं मुळावं मुरावं कसं तर? झाडासारखं घट्ट पाय रोवीत जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं! |
1. चौकटी पूर्ण करा. (2)
- मुळावर घाव घातले; तरी मुकाट सहन करणारे - ______
- अलगद उतरणारे थेंब - ______
2. आकृती पूर्ण करा. (2)
3. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)
- मुकाट -
- मुसाफिर -
- संथ -
- मौन व्रत -
4. काव्यसाैंदर्य: (2)
'जगावं कसं तर? हिरव्या झाडासारखं' या ओळीतील अर्थसाैंदर्य स्पष्ट करा.
Concept: हिरवंगार झाडासारखं
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा:
मुद्दे | हिरवंगार झाडासारखं |
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवियित्री - | |
(2) प्रस्तुत कवितेचा विषय - | |
(3) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा - | झाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत... |
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - | |
(5) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा - | (i) मौन - |
(ii) मुकाट - | |
(iii) वस्त्र - | |
(iv) ब्राहू - |
Concept: हिरवंगार झाडासारखं
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | ‘हिरवंगार झाडासारखं’ |
(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
(२) कवितेचा रचनाप्रकार - | |
(३) कवितेचा काव्यसंग्रह - | |
(४) कवितेचा विषय - | |
(५) कवितेतील आवडलेली ओळ - | |
(६) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे - |
Concept: हिरवंगार झाडासारखं
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) कोण, ते लिहा: (2)
- निरंजनचा सर्व खर्च करणारे -
- निरंजनला मावशीकडे सोडून पुन्हा न परतलेला -
मामा गेला तो पुन्हा परतला नाही मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं. मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी त्याला थोरामोठ्यांच्या घरी वार लावून दिले. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा, मग तिथून शाळेत. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायचा. सकाळी लवकर उठून घरातली, गोठ्यातली सारी कामं आटपून अभ्यासाला बसायचा. गुरुजींवर श्रद्धा ठेवायचा आणि परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा. त्याच्या वह्या-पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजीच करायचे. गुरुजींनी त्याला सांगितलं, की ‘जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे, तोपर्यंतच मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन. नाहीतर नाही.’ गुरुजींचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा. आज नागरिकशास्त्राचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर्स चांगले गेले असल्याने तो मनोमन खूश होता. |
(2) का ते लिहा: (2)
- निरंजन वार लावून जेवायचा, कारण ______
- निरंजन झटून अभ्यास करायचा, कारण ______
(3) तुम्हांला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहा. (3)
Concept: खरा नागरिक
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. (2)
- पहाटे चार वाजता शेवटची गाडी इथून जाते.
- निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठले.
- स्टेशन इथून खूप दूर होतं.
- पुलावरचे रूळ चांगल्या स्थितीत होते.
रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते. त्यानंतर पहाटेस कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा. आता प्रवाशांनी भरलेली नऊ पन्नासची गाडी येईल. निरंजन एकदम सावध झाला. गाडी आली तर भयंकर अपघात होईल, हे त्याच्या लक्षात आलं. निरंजन नागरिकशास्त्राचा पेपर, देशमुखांकडचं जेवण सारं विसरला. त्याच्या डोळ्यांसमोर धाड्धाड् आवाज करत येणारी रेल्वेगाडी दिसू लागली. कानठळ्या बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या कानांत घुमू लागल्या. स्टेशन इथून खूप दूर होतं. तीन-चार किलोमीटर तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती. मग नापास. भडसावळे गुरुजींची मदत बंद. शिक्षणही बंद. रेल्वेने फिरायचं स्वप्न अपुरंच राहणार होतं; परंतु मन मानायला तयार नव्हतं. त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. तो स्टेशनात शिरला तेव्हा नऊ पन्नासची गाडी नुकतीच आली होती. आता पाच मिनिटांतच ती सुटणार होती. निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठलं. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं; पण ते त्यांना खरंच वाटेना. अखेर निरंजनने आर्जवं केली, की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेन, तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या. |
(2) आकृतिबंध पूर्ण करा. (2)
(3) स्वमत. (3)
तुम्हांला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्यांची गुणवैशिष्ट्ये लिहा.
Concept: खरा नागरिक
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | 'स्वप्न करू साकार' |
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
2. प्रस्तुत कवितेचा विषय | |
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. | 'हजार आम्ही एकी बळकट। सर्वांचे हो एकच मनगट।।' |
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. | i. विभव - ii. मंगल - iii. श्रम - iv. हस्त - |
Concept: स्वप्न करू साकार
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | ‘स्वप्न करू साकार’ |
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
(2) प्रस्तुत कवितेचा विषय - | |
(3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. | ‘या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार’ |
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. | (i) ललकारणे - |
(ii) नौबत - | |
(iii) विभव - | |
(iv) श्रम - |
Concept: स्वप्न करू साकार
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
कृती | ‘स्वप्न करू साकार’ |
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
(2) प्रस्तुत कवितेचा विषय - | |
(3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - | |
(4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ - |
‘या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार’ |
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ - | (i) विभव - |
(ii) शक्ती - | |
(iii) विश्व - | |
(iv) हस्त - |
Concept: स्वप्न करू साकार
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
जीवनज्योती विद्यालय, नांदगाव प्रमुख पाहुणे – मा. श्री. अजय लागू संपर्क – [email protected] दीपक/दीपाली माने |
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने |
पारितोषिक प्राप्त विद्यार्थी सुहास/सुनीता देसाई, यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. |
Concept: पत्रलेखन
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
जीवनज्योती विद्यालय, नांदगाव प्रमुख पाहुणे – मा. श्री. अजय लागू संपर्क – [email protected] दीपक/दीपाली माने |
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून मा. उत्तम कांबळे यांना उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र लिहा. |
Concept: पत्रलेखन
संयमाला तुच्छ मानू नका. तुमच्या विकासासाठी तो आहे. समाजाच्या हितासाठी तो आहे. आपण संयम पाळला नाही, तर आपले काम नीट होणार नाही. काम नीट झाले नाही म्हणजे समाजाचे नुकसान होणार. आपण केवळ आपल्या स्वत:साठी नाही. आपण समाजासाठी आहोत, याची जाणीव आपणांस हवी. हा आपला देह, हे आपले जीवन समाजाचे आहे. आपले पोषण सारी सृष्टी करीत आहे. सूर्य प्रकाश देत आहे, मेघ पाणी देत आहेत, वृक्ष फुले-फळे देत आहेत, शेतकरी धान्य देत आहे, विणकर वस्त्र देत आहे. आपण या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीचे आभारी आहोत. यासाठी हे आपले जीवन त्यांच्या सेवेत अर्पण करणे हे आपले काम आहे. |
वरील उताऱ्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: सारांश लेखन
पुढील विषयावर जाहिरात तयार करा.
शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला वर्गाची जाहिरात तयार करा.
Concept: जाहिरात लेखन
खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा.
आंतरशालेय क्रीडास्पर्धा – धावण्याची स्पर्धा – शाळेतर्फे वरदचा सहभाग – वरद उत्तम धावपटू – सराव – उत्तम धावपटू तनयशी स्पर्धा – प्रत्यक्ष स्पर्धा – चुरशीची स्पर्धा – अचानक तनयचा पाय मुरगळणे – स्पर्धा सोडून वरदचे मदतीला धावणे – स्पर्धा हरूनही वरदचे कौतुक –
Concept: कथालेखन