Advertisements
Advertisements
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
जनता विद्यालय अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा दि. 2 जानेवारी वेळ स. 10.00 वाजता. संपर्क- मुख्याध्यापक, जनता विद्यालय, अहमदनगर. E-mail - [email protected] मोबाइल - 0211556680 |
अभय/आर्या दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उत्तम आयोजनाबद्दल मुख्याध्यापकांना अभिनंदन करणारे पत्र लिहा. |
Concept: पत्रलेखन
तुमच्या शाळेत 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी लिहा.
Concept: बातमी लेखन
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.
मुद्दे: अनाथ मुलगा – रोज सकाळी वर्तमानपत्राचे वाटप – दुपारी शाळेत – रस्त्यात एक पाकीट मिळते – वर्गशिक्षकांकडे देणे – पाकिटावरील पत्यावरून योग्य व्यक्तिपर्यंत पोहोचवणे – मालकाला आनंद – शाबासकी – मुलाला बक्षीस व त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे.
Concept: कथालेखन
‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
Concept: निबंध लेखन
खालील उताऱ्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
दारावर कुणी भिक्षा मागण्यास आला, तर आई त्याला भिक्षा घालत असे. एके दिवशी एक धडधाकट भिकारी आला असता रुक्मिणीबाई त्याला भिक्षा घालू लागल्या. विनोबा त्यांना म्हणाले, “हा तर धडधाकट दिसतो. अशा लोकांना जर भिक्षा देत गेलो, तर देशात आळस वाढेल. अपात्राला दान केले, तर त्यामुळे दान देणाऱ्याचेही अकल्याण होते.” रुक्मिणीबाईंनी ते शांतपणे ऐकले आणि म्हणाल्या, “विन्या, पात्र-अपात्र यांची परीक्षा करणारे आम्ही कोण? दारावर आलेला प्रत्येक माणूस परमेश्वररूप समजून त्याला शक्तिनुसार देत राहणे एवढे आपले काम आहे. त्याची परीक्षा करणारी मी कोण”? विनोबांनी त्यावर टिपणी केलीय, की ‘आईच्या या युक्तिवादावर विन्याला दुसरा, युक्तिवाद सुचला नाही.’ |
Concept: सारांश लेखन
अश्वमेध सभागृह – दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या – – कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन – दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8 प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी. |
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
Concept: निबंध लेखन
खालील अपठित उताऱ्याचा 1/3 एवढा सारांश लिहा.
मानवी जीवनविकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकास करते. शिक्षणाशिवाय माणूस पशूसमान होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही, तर अर्धा अधिक समाज मागासलेला राहील. आजकाल जगातील पुष्कळशा भागांत आपणांस स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. परिणामत: पुष्कळ वाईट रीतिभाती आणि अंधश्रद्धा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत. |
Concept: सारांश लेखन
खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा.
चला करूया भ्रमंती फुलपाखरांच्या जगात नाव नोंदणी आवश्यक त्वरा करा! त्वरा करा! त्वरा करा! मोजक्याच जागा शिल्लक राष्ट्रीय उद्यानातील जंगल भ्रमंती! घेऊया फुलपाखरांच्या विश्वाचा रोमहर्षक अनुभव वयोगट: 10 ते 15, नोंदणी शुल्क - रु. 200/- कालावधी: 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर संपर्क: जंगल भ्रमंती संस्था, तापोळा (आयोजक) |
कृती करा:
- जंगल भ्रमंतीसाठी नोंदणी शुल्क -
- उद्यानात भ्रमंती करण्यासाठी वयोगट -
- उद्यानात फिरण्याचा कालावधी -
- जंगल भ्रमंतीचे ठिकाण -
- आयोजक संस्थेचे नाव -
Concept: जाहिरात लेखन
खालील विषयावर बातमी तयार करा:
जनता विद्यालय, शिरवळ येथे मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा.
प्रमुख पाहुणे - ज्येष्ठ साहित्यिक - श्री. अरविंद मोरे
अध्यक्ष - श्री. सागर शिंदे
दि. 27 फेब्रुवारी वेळ - स. 10.00
Concept: बातमी लेखन
“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.
वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.
Concept: निबंध लेखन
पुढील मुद्दयांवरुन कथालेखन करा.
मुद्दे - एक राजा - त्याची प्रजा आळशी होती - त्यांना उद्योगी बनवण्यासाठी राजा युक्ती करतो - रस्त्यात मधोमध दगड ठेवतो - त्यांच्याखाली - सोन्याची नाणी असलेली पिशवी - अनेक लोक जातात, पण दगड उचलत नाहीत - एक गरीब माणूस तो उचलतो - पिशवीतील नाणी त्याला मिळतात - लोकांना हे कळते - लोक उद्योगी बनतात -
Concept: कथालेखन
'झाडे लावा........ झाडे जगवा. ' हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे |
कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र ट्रस्टच्या व्यवस्थापकांना लिहा.
Concept: पत्रलेखन
'झाडे लावा........ झाडे जगवा. ' हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे |
कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाईट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
Concept: पत्रलेखन
वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
Concept: निबंध लेखन
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
रस्ता -
Concept: व्याकरण
खालील वाक्याचा प्रकार ओळखा:
शाल व शालीनता यांचा संबंध काय?
Concept: वाक्यरूपांतर
खालील शब्दांला समानार्थी शब्द लिहा.
वृक्ष -
Concept: शब्दसंपत्ती > समानार्थी शब्द
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
मार्ग -
Concept: शब्दसंपत्ती > समानार्थी शब्द
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
ज्ञानी × ______
Concept: शब्दसंपत्ती > विरुद्धार्थी शब्द