English

तुमच्या शाळेत 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

तुमच्या शाळेत 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी लिहा.

Writing Skills

Solution

शिक्षक दिन साजरा

६ सप्टेंबर

विद्या निकेतन हाय स्कूल

दि. 5 सप्टेंबर रोजी आमच्या शाळेत ‘शिक्षक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.

विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. गायन, नृत्य, भाषण आणि विनोदी नाटिका यांमधून विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत शाळा चालवण्याचा अनुभव घेतला.

मुख्याध्यापकांनी शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करत भाषण केले. त्यांनी शिक्षकांच्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचा समारोप शिक्षकांचा सत्कार व आभार प्रदर्शनाने झाला.

या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या नात्यातील प्रेम अधिक घट्ट झाले आणि हा दिवस शाळेसाठी अविस्मरणीय ठरला.

shaalaa.com
बातमी लेखन
  Is there an error in this question or solution?
2022-2023 (March) Official

RELATED QUESTIONS

खालील शीर्षकावरून बातमी तयार करा.

शाळेत वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम, वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांच्या उपस्थितीत संपन्न.

खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:


पुढील विषयावर बातमी तयार करा.

जनता गर्ल्स हायस्कूल, शेंदूरजना घाट येथे “जागतिक महिला दिन” साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी तयार करा.


दिलेल्या शब्दांवरून बातमी तयार करा.

शाळा ______ कोरोना ______ मोबाइल ______ शिक्षण सुरू ______ अभ्यासक्रम ______समस्या.


पुढील घटनेवर आधारित बातमी तयार करा.

कोरोना आला नी _____ गाव स्वच्छ झाले.


पुढील शीर्षकावरून बातमी तयार करा.

बालिका दिननिमित्त, “बेटी बचाओ! बेटी पढाओ!” या उपक्रमास जिल्ह्यातील अनेक शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:

अभिनव विद्यालय, नागपूर
‘भव्य विज्ञान प्रदर्शन’ संपन्न.
दि. 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर
वेळ स. 11 ते सं. 5 वाजेपर्यंत
अध्यक्ष - श्री. सुहास माने
प्रमुख पाहुणे - श्री. आशिष वाघ

  • एकूण 50 शाळांचा सहभाग
  • उद्घाटन सोहळा संपन्न
  • उत्कृष्ट प्रकल्पांना पारितोषिके
  • विज्ञान नाटिका सादर

वृद्ध दिनानिमित्त संपन्न झालेल्या वरील कार्यक्रमाची बातमी तयार करून लिहा.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.

आदर्श विद्यालय

रवीनगर, गडचिरोली

‘विज्ञानदिन सोहळा’

विज्ञानदिनानिमित्त

वैज्ञानिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन

उद्घाटक - डॉ. श्री. विजय आफळे, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख

सिटी कॉलेज, गडचिरोली

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली.

विज्ञानदिनानिमित्त आयोजित प्रदर्शन सोहळ्याची बातमी करून लिहा.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.

अति पाऊस – कोयना धरणातून विसर्ग – नदीकाठच्या लोकांना इशारा देणे.

खालील विषयावर बातमी तयार करा.

तलाव ओसंडून वाहू लागले. गावकऱ्यांसाठी आनंदवार्ता.


खालील विषयावर बातमी तयार करा.

शहरात डेंग्यूचा वाढता फैलाव म. न. पा. कडून आरोग्य तपासणी.


खालील विषयावर बातमी तयार करा.

सचिन तेंडुलकरचा वाढदिवस युवा हेल्थ क्लबकडून उत्साहात साजरा.


खालील विषयावर बातमी तयार कराः

'ज्ञानज्योत विद्यालय', वर्धा येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा झाला.


खालील विषयावर बातमी तयार करा:

अभिनव विद्यालय, सोलापूर
शालांत परीक्षेस बसलेल्या विदयार्थ्यांसाठी
'शुभेच्छा समारंभ'

दि. 25 फेब्रुवारी,  वेळ - ११:०० वा.

अध्यक्ष : मां. श्री. विजय जोशी

प्रमुख पाहुणे - मां. श्री. विशाल साठे (समाजसेवक)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×