Advertisements
Advertisements
Question
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:
Solution
जनमानस सानेगुरुजी विद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव संपन्न सोलापूर, १४ जानेवारी २०२०: काल दिनांक १३ जानेवारी रोजी सानेगुरुजी विद्यालय, सोलापूर आयोजित वार्षिक क्रिडा महोत्सव पार पडला. या क्रिडा महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. रोहित बर्वे हे होते, तर सुप्रसिद्ध धावपटू मा. सौ. अपर्णा भोसले या महोत्सवात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सानेगुरुजी विद्यालयातील इयत्ता ५ वी ते इयत्ता ९ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी या क्रिडा महोत्सवात भाग घेतला होता. सकाळी ८ वाजता क्रिडा महोत्सवाची सुरुवात झाली. कबड्डी, खो-खो, लंगडी, गोळाफेक, धावण्याची शर्यत यांसारख्या पारंपरिक खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे बास्केटबॉल, फुटबॉल असे पाश्चिमात्य खेळांच्या स्पर्धाही झाल्या. खेळासोबत शिस्त व लयबद्ध पद्धतीने कवायत प्रकार, मल्लखांब प्रकार तसेच लेझीम नृत्य यांसारखे क्रिडा साहित्यावर आधारित नृत्यप्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यानंतर क्रिडा महोत्सवाचे अध्यक्ष मा. श्री. रोहित बर्वे आणि प्रमुख पाहुण्या मा. सौ. अपर्णा भोसले यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. 'मानवाच्या आयुष्यातील खेळाचे महत्त्व' या विषयावर मा. सौ. अपर्णा भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रगीताने क्रिडा-महोत्सवाची सांगता करण्यात आली. |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील विषयावर बातमी तयार करा.
रेल्वे प्रवासात प्रवासी नागरिकांजवळ स्वओळखपत्र असणे अनिवार्य. (आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड यांपैकी कोणतेही एक.)
पुढील घटनेवर आधारित बातमी तयार करा.
कोरोना आला नी _____ गाव स्वच्छ झाले.
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:
अभिनव विद्यालय, नागपूर
|
वृद्ध दिनानिमित्त संपन्न झालेल्या वरील कार्यक्रमाची बातमी तयार करून लिहा.
कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त, दि. 27 फेब्रुवारी रोजी ‘साधना विद्यालय, रायरी’ या विद्यालयात ‘मराठी भाषा दिन’ साजरा झाला.
या समारंभाची बातमी तयार करा.
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.
![]() |
आदर्श विद्यालय रवीनगर, गडचिरोली ‘विज्ञानदिन सोहळा’ विज्ञानदिनानिमित्त |
![]() |
वैज्ञानिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन उद्घाटक - डॉ. श्री. विजय आफळे, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख सिटी कॉलेज, गडचिरोली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली. |
विज्ञानदिनानिमित्त आयोजित प्रदर्शन सोहळ्याची बातमी करून लिहा.
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.
अति पाऊस – कोयना धरणातून विसर्ग – नदीकाठच्या लोकांना इशारा देणे. |
खालील मुद्द्यांवरून बातमी तयार करा.
आदर्श शिक्षक पारितोषिक सोहळा शिक्षक दिनानिमित्त विद्या मंदिर शाळेतर्फे आदर्श आणि गुणी शिक्षकांचा सत्कार
|
खालील विषयावर बातमी तयार करा.
8 मार्च ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ शाळेत ‘माता-पालक मेळावा’ व विविध स्पर्धांचे आयोजन पालकांचा उदंड प्रतिसाद.
खालील विषयावर बातमी तयार करा.
तलाव ओसंडून वाहू लागले. गावकऱ्यांसाठी आनंदवार्ता.
खालील विषयावर बातमी तयार करा.
शहरात डेंग्यूचा वाढता फैलाव म. न. पा. कडून आरोग्य तपासणी.
खालील विषयावर बातमी तयार करा.
सचिन तेंडुलकरचा वाढदिवस युवा हेल्थ क्लबकडून उत्साहात साजरा.
खालील विषयावर बातमी तयार करा:
जनता विद्यालय, शिरवळ येथे मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा.
प्रमुख पाहुणे - ज्येष्ठ साहित्यिक - श्री. अरविंद मोरे
अध्यक्ष - श्री. सागर शिंदे
दि. 27 फेब्रुवारी वेळ - स. 10.00
खालील विषयावर बातमी तयार कराः
'ज्ञानज्योत विद्यालय', वर्धा येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा झाला.