English

खालील शीर्षकावरून बातमी तयार करा. शाळेत वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम, वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांच्या उपस्थितीत संपन्न. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील शीर्षकावरून बातमी तयार करा.

शाळेत वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम, वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांच्या उपस्थितीत संपन्न.
Writing Skills

Solution

जनसत्ता

वसुंधरा दिन उत्साहात साजरा

'वसुंधरा दिनानिमित्त' वृक्षदिंडी व वृक्षारोपण
कार्यक्रम, वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांच्या उपस्थितीत संपन्न

दि. ६ जून २०१८
आमच्या प्रतिनिधीकडून,

दिनांक ५ जून २०१८ रोजी साधना विद्यालयाच्या वतीने 'वसुंधरा दिनानिमित्त' वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते झाल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थीवर्गासोबत ते स्वत: वृक्षदिंडीत सहभागी झाले. आपल्या अध्यक्षीय भाषणाद्वारे त्यांनी 'वृक्षांचे संवर्धन ही काळाची गरज' या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. प्रस्तुत कार्यक्रमाच्या समारोपसमयी पाहुण्यांसह सर्व उपस्थितांना एकेक तुळशीचे रोप देऊन सर्वांचे आभार मानण्यात आले. या अनोख्या आभार 'भेटीचे' संवर्धन प्रत्येकाने करावे यासाठी सामूहिक शपथविधी झाला आणि हा सोहळा संपन्न झाला.

shaalaa.com
बातमी लेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 16.3: उपयोजित लेखन - बातमीलेखन [Page 75]

APPEARS IN

Balbharati Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 16.3 उपयोजित लेखन
बातमीलेखन | Q १ | Page 75

RELATED QUESTIONS

पुढील विषयावर बातमी तयार करा.

जनता गर्ल्स हायस्कूल, शेंदूरजना घाट येथे “जागतिक महिला दिन” साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी तयार करा.


पुढील समारंभाची बातमी तयार करा.

शाळेच्या सुवर्णमहोत्सवाचा उद्घाटन समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


पुढील शीर्षकावरून बातमी तयार करा.

बालिका दिननिमित्त, “बेटी बचाओ! बेटी पढाओ!” या उपक्रमास जिल्ह्यातील अनेक शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद.


वृद्ध दिनानिमित्त संपन्न झालेल्या वरील कार्यक्रमाची बातमी तयार करून लिहा.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.

आदर्श विद्यालय

रवीनगर, गडचिरोली

‘विज्ञानदिन सोहळा’

विज्ञानदिनानिमित्त

वैज्ञानिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन

उद्घाटक - डॉ. श्री. विजय आफळे, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख

सिटी कॉलेज, गडचिरोली

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली.

विज्ञानदिनानिमित्त आयोजित प्रदर्शन सोहळ्याची बातमी करून लिहा.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.

अति पाऊस – कोयना धरणातून विसर्ग – नदीकाठच्या लोकांना इशारा देणे.

खालील मुद्द्यांवरून बातमी तयार करा.

आदर्श शिक्षक पारितोषिक सोहळा

शिक्षक दिनानिमित्त विद्या मंदिर शाळेतर्फे

आदर्श आणि गुणी शिक्षकांचा सत्कार

  • प्रमुख पाहुणे: कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई.
  • स्थळ: विद्या मंदिर शाळा, कात्रज, पुणे.
  • वेळ: दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत
  • दिनांक: ५ सप्टेंबर, २०१७

तुमच्या शाळेत 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी लिहा.


खालील विषयावर बातमी तयार करा.

सचिन तेंडुलकरचा वाढदिवस युवा हेल्थ क्लबकडून उत्साहात साजरा.


खालील विषयावर बातमी तयार करा:

अभिनव विद्यालय, सोलापूर
शालांत परीक्षेस बसलेल्या विदयार्थ्यांसाठी
'शुभेच्छा समारंभ'

दि. 25 फेब्रुवारी,  वेळ - ११:०० वा.

अध्यक्ष : मां. श्री. विजय जोशी

प्रमुख पाहुणे - मां. श्री. विशाल साठे (समाजसेवक)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×