Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शीर्षकावरून बातमी तयार करा.
शाळेत वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम, वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांच्या उपस्थितीत संपन्न. |
उत्तर
जनसत्ता |
वसुंधरा दिन उत्साहात साजरा 'वसुंधरा दिनानिमित्त' वृक्षदिंडी व वृक्षारोपण दि. ६ जून २०१८ दिनांक ५ जून २०१८ रोजी साधना विद्यालयाच्या वतीने 'वसुंधरा दिनानिमित्त' वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते झाल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थीवर्गासोबत ते स्वत: वृक्षदिंडीत सहभागी झाले. आपल्या अध्यक्षीय भाषणाद्वारे त्यांनी 'वृक्षांचे संवर्धन ही काळाची गरज' या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. प्रस्तुत कार्यक्रमाच्या समारोपसमयी पाहुण्यांसह सर्व उपस्थितांना एकेक तुळशीचे रोप देऊन सर्वांचे आभार मानण्यात आले. या अनोख्या आभार 'भेटीचे' संवर्धन प्रत्येकाने करावे यासाठी सामूहिक शपथविधी झाला आणि हा सोहळा संपन्न झाला. |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:
दिलेल्या शब्दांवरून बातमी तयार करा.
शाळा ______ कोरोना ______ मोबाइल ______ शिक्षण सुरू ______ अभ्यासक्रम ______समस्या.
पुढील घटनेवर आधारित बातमी तयार करा.
कोरोना आला नी _____ गाव स्वच्छ झाले.
पुढील शीर्षकावरून बातमी तयार करा.
बालिका दिननिमित्त, “बेटी बचाओ! बेटी पढाओ!” या उपक्रमास जिल्ह्यातील अनेक शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद.
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.
अति पाऊस – कोयना धरणातून विसर्ग – नदीकाठच्या लोकांना इशारा देणे. |
खालील मुद्द्यांवरून बातमी तयार करा.
आदर्श शिक्षक पारितोषिक सोहळा शिक्षक दिनानिमित्त विद्या मंदिर शाळेतर्फे आदर्श आणि गुणी शिक्षकांचा सत्कार
|
तुमच्या शाळेत 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी लिहा.
खालील विषयावर बातमी तयार करा.
तलाव ओसंडून वाहू लागले. गावकऱ्यांसाठी आनंदवार्ता.
खालील विषयावर बातमी तयार करा:
जनता विद्यालय, शिरवळ येथे मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा.
प्रमुख पाहुणे - ज्येष्ठ साहित्यिक - श्री. अरविंद मोरे
अध्यक्ष - श्री. सागर शिंदे
दि. 27 फेब्रुवारी वेळ - स. 10.00
खालील विषयावर बातमी तयार कराः
'ज्ञानज्योत विद्यालय', वर्धा येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा झाला.