Advertisements
Advertisements
प्रश्न
0, 1, 2, 3, 4 यांपैकी अंक घेऊन दोन अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती केलेली चालेल, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
ती संख्या 4 च्या पटीत असणे.
उत्तर
नमुना अवकाश
S = {10, 11, 12, 13, 14,
20, 21, 22, 23, 24,
30, 31, 32, 33, 34,
40, 41, 42, 43, 44}
∴ n(S) = 20
समजा, घटना B: तयार केलेली संख्या 4 च्या पटीत असणे.
∴ B = {12, 20, 24, 32, 40, 44}
∴ n(B) = 6
∴ P(B) = `("n"("B"))/("n"("S")) = 6/20`
∴ P(B) = `3/10`
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
एक फासा फेकला असता नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या ______ आहे.
एका खोक्यात 5 स्ट्रॉबेरीची, 6 कॉफीची व 2 पेपरमिंटची चॉकलेट्स आहेत. त्या खोक्यातील एक चॉकलेट काढले, तर खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी कृती पूर्ण करा.
घटना A: काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे.
घटना B: काढलेले चॉकलेट पेपरमिंटचे असणे.
कृती: समजा, नमुना अवकाश 'S’ आहे.
∴ n(S) = 5 + 6 + 2 = 13
घटना A : काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे.
∴ n(A) = `square`
∴ P(A) = `square/("n"("S"))` ............[सूत्र]
P(A) = `square/13`
घटना B: काढलेले चॉकलेट पेपरमिंटचे असणे.
∴ n(B) = `square`
∴ P(B) = `square/("n"("S"))` ............[सूत्र]
P(B) = `square/13`
दोन नाणी फेकली असता खालील घटनाची संभाव्यता काढा.
कमीत कमी एक छापा मिळणे.
दोन नाणी फेकली असता खालील घटनाची संभाव्यता काढा.
एकही छापा न मिळणे.
योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
एक्का मिळणे.
1 ते 100 यांमधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता _____ असेल.
एका खोक्यात 5 लाल पेनं, 8 निळी पेनं आणि 3 हिरवी पेनं आहेत. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला एक पेन काढायचे आहे, तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा.
एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांपैकी 135 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो व इतरांना हा खेळ आवडत नाही. सर्व विद्यार्थ्यांतून 1 विद्यार्थी निवडला, तर त्याला कबड्डी हा खेळ आवडत नसण्याची संभाव्यता काढा.
एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून 1 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेला चेंडू लाल नसणे.
एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून 1 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेला चेंडू लाल किंवा पांढरा असणे