Advertisements
Advertisements
प्रश्न
₹ 2,000 ही रक्कम 10% सरळव्याज दराने गुंतवली, तर प्रत्येक वर्षाच्या शेवटी मिळणाऱ्या व्याजाची रक्कम अंकगणितीय श्रेढी होईल का हे तपासा. ती अंकगणितीय श्रेढी होत असेल, तर 10 वर्षांनंतर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम काढा.
योग
उत्तर
मुद्दल (P) = ₹ 2,000
व्याजदर (R) = 10%
सरळव्याज = `("P" xx "R" xx "N")/100`
1 वर्षानंतर मिळणारे सरळव्याज = `(2000 xx 10 xx 1)/100` = ₹ 200
2 वर्षानंतर मिळणारे सरळव्याज = `(2000 xx 10 xx 2)/100` = ₹ 400
3 वर्षानंतर मिळणारे सरळव्याज = `(2000 xx 10 xx 3)/100` = ₹ 600
आता,
400 − 200 = 200
600 − 400 = 200
अशाप्रकारे, सरळव्याजाची रक्कम अंकगणिती श्रेढी तयार करते.
येथे, a = 200, d = 200
Tn = a + (n − 1)d
T10 = a + (10 − 1)d
T10 = a + 9d
T10 = 200 + 9(200)
T10 = 2000
∴ 10 वर्षांनंतर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम ₹ 2000 आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?