Advertisements
Advertisements
प्रश्न
आंतरजालाचा उपयोग करून भारतीय जलतरणपटू यांची माहिती घ्या. प्रत्येक खेळाडूची माहिती चारपाच वाक्यांत लिहा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
- रूपाली रामदास रेपाळे: १२ व्या वर्षी इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय मुलगी. १५ ऑगस्ट १९९४ रोजी तिने १६ तास व ७ मिनिटांत खाडी पोहून पूर्ण केली. तिने आतापर्यंत जिब्रल्टर, पाल्क, धरमतर यांसारख्या ७ खाड्या पोहून पार केल्या आहेत. रूपालीला सागरकन्या, डॉल्फिन क्वीन या नावांनीही ओळखले जाते.
- वीरधवल खाडे: जलतरणासाठी ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेला सर्वांत तरुण जलतरणपटू. २००८ साली त्याने बीजिंग येथे ५० मीटर, १०० मीटर व २०० मीटर जलतरण स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी दाखवली. २०१० साली त्याची अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली होती. त्याने अनेक पदके, पुरस्कार मिळवले आहेत.
- प्रसन्ता कर्माकर: शारीरिक अपंगत्वावर मात करून जलतरणात पदक मिळवणारा तरुण. २००९ मध्ये अर्जेंटिनाच्या विश्व जलतरण स्पर्धेत त्याने उत्तम यश मिळवले. २००९ साली ४ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य पदके त्याने मिळवली आहेत. ह्या महान खेळाडूला 'अर्जुन पुरस्कार', 'कोलकाता श्री पुरस्कार', 'मेजर ध्यानचंद पुरस्कार' यांसारखे विविध पुरस्कार मिळाले आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याचे नाव लिहिले गेले आहे.
- शिखा टंडन: वयाच्या १२ व्या वर्षी २ राष्ट्रीय जलतरण स्पर्धांत कांस्य पदके मिळवणारी जलतरणपटू. वयाच्या १६ व्या वर्षी पहिली विश्वविजेती जलतरणपटू होण्याचा मान पटकावला. सलग ३ वर्षे उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून तिचा गौरव झाला. १४६ राष्ट्रीय, तर ३६ आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील पदके तिने मिळवली आहेत.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
संबंधित प्रश्न
का ते लिहा.
मुलांना गहिवरून आले.
भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याचे हे घरटे वादळात शाबूत का राहते?
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘मला ती पुस्तके वाचायला आवडतील!’’
खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
(अ) शब्द -
(आ) स्पष्ट -
(इ) बुद्धी -
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
लगोरी -
खालील तक्ता पूर्ण करा.
लोखंडी वस्तू | काचेच्या वस्तू | लाकडी वस्तू | मातीच्या वस्तू |
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
'मुक्या प्राण्यांची कैफियत' या पाठात कोणाकोणांत संवाद झालेला आहे?