Advertisements
Advertisements
प्रश्न
आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा?
उत्तर
प्रथमोपचाराचा प्रमुख उद्देश जीवहानी टाळणे, प्रकृती खराब होत जाण्यापासून रोखणे आणि पुनर्लाभाची प्रक्रिया सुरू करणे हा असतो. त्यामुळे प्रथमोपचार किंवा तातडीने करायच्या उपाययोजना कोणत्या आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
आपत्तीग्रस्तांवर खालील प्रथमोपचार केले पाहिजेत:
- श्वसनमार्ग (Airway): आपद्ग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल तर डोके उतरते करावे किंवा हनुवटीला वर उचलावे त्यामुळे श्वासनलिका खुली राहते.
- श्वासोच्छवास (Breathing): जर श्वासोच्छवास बंद झाला असेल तर आपद्ग्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा.
- रक्ताभिसरण (Circulation): जर आपद्ग्रस्त बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्या व्यक्तीला प्रथम दोनदा कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा व नंतर छातीवर दोन तळव्यांनी हात ठेवून हृदयावर जोराचा दाब देवून सोडणे ही प्रक्रिया सुमारे 15 वेळेस करावी. याला CPR (Cardio - Pulmonary Resuscitation) म्हणतात. आपद्ग्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण परत सुरळीतपणे चालू होण्यास मदत होते.
- रक्तस्राव: जर आपद्ग्रस्त व्यक्तीला जखम होऊन त्यामधून रक्तस्राव सुरू झाला असेल तर त्या जखमेवर निर्जंतुक आवरण ठेवून अंगठा किंवा तळव्याचा दाब 5 मिनिटे द्यावा.
- अस्थिभंग व मणक्यावर आघात: जर आपदग्रस्त व्यक्तीचे हाड मोडले असेल तर त्या हाड मोडलेल्या भागाचे अचलकरण (Immobilisation) करणे अत्यावश्यक असते. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या फळ्या उपलब्ध असतील त्या बांधून अचल करण्यासाठी उपयोग करावा. पाठीवर/मणक्यावर आघात झालेल्या व्यक्तीला कठीण रूग्णशिबिकेवर (Hard Stretcher) ठेवावे.
- पोळणे-भाजणे: जर आपद्ग्रस्तांना आगीच्या ज्वालांनी होरपळले असेल तर त्यांना किमान 10 मिनिटे भाजलेल्या जागेवर व होरपळलेल्या भागांवर थंड पाण्याच्या सतत धारेखाली धरणे फायदेशीर ठरते.
- लचक, मुरगळणे, चमक भरणे, मुका मार: आपद्ग्रस्ताला आरामदायक अवस्थेत बसवावे. आपद्ग्रस्ताला मार लागलेल्या जागेवर बर्फाचे पोटीस ठेवावे. बर्फाचे पोटीस थोडा वेळ ठेवल्यावर मग त्या भागाला हळूवार मसाज करावा. मार लागलेला भाग उंचावून ठेवावा.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे?
आपद्ग्रस्ताचे/रुग्णाचे ने-आण करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात? का?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?
व्याख्या लिहा.
प्रथमोपचार
रुग्णांचे वहन करण्याच्या पद्धती वापरताना कोणती काळजी घ्यावी ते सोदाहरण स्पष्ट करा.
टीपा लिहा.
प्रथमोपचाराची मूलतत्त्वे
प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही सहा साहित्यांची नावे लिहा.