Advertisements
Advertisements
प्रश्न
‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.
उत्तर
'शुभंकरोति कल्याणम्। आरोग्यम् धनसंपदा।' अशी प्रार्थना केली जाते. आरोग्याला 'धनसंपदा' म्हटले गेले आहे. कारण माणूस निरोगी असेल, तरच तो विविध कामांत सहभागी होऊ शकतो. आपला शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करू शकतो. दिलेले कार्य उत्तमरीत्या पार पाडू शकतो. जर माणसाकडे उत्तम आरोग्य नसेल, तर तो समाजाला, त्याच्या परिवाराला भारस्वरूप असतो. रोगी माणसाला सुख, समाधान मिळू शकत नाही. त्याने कमावलेले सारे धन त्याच्या आजारपणातच वाया जाते. म्हणूनच, शरीराकडे दुर्लक्ष करून धन कमावण्यापेक्षा आरोग्यरूपी धन कमावणेच जास्त योग्य आहे. निरोगी शरीरसंपदेच्या बळावर आपण कितीही धन कमावू शकतो. आपले जीवन सुखी, समाधानी ठेवण्याची गुरुकिल्ली म्हणजेच उत्तम आरोग्य होय, म्हणूनच 'आरोग्यम् धनसंपदा' असे म्हटले जाते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य अर्थ शोधा.
आस लागणे म्हणजे ______.
चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.
व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.
व्यायामाने जडत्व वाढते.
व्यायामाने स्नायू अशक्त होतात.
व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.
‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
कारण लिहा.
कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण .............
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.
घटक | त्यांचे सजणे |
(१) लिंबोणी | |
(२) नागफणी | |
(३) घाणेरी | |
(४) पळसफुले |
‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
गोष्टी | परिणाम |
वीज चमकणे |
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
पेरणीसाठी लागणारे बियाणे
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काकरात बिजवाई जस हासरं चांदनं
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते
या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
वऱ्हाडी शब्द | प्रमाणभाषेतील शब्द |
‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.