हिंदी

चौकटी पूर्ण करा: कवितेत आलेल्या नद्यांची नावे - हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे।।धृ।। हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (4)

(1) चौकटी पूर्ण करा: (2)

  1. कवितेत आलेल्या नद्यांची नावे - ______, ______
  2. मनातून वाहून जाण्यात अशा गोष्टी - ______, ______

हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे।।धृ।।

हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा
ह्या गंगा, यमुना, शेती, धरती, बागबगीचा माझा
अभिलाषा यांची धरिता, कुणी नजर वाकडी करता
या मरण द्यावया, स्फुरण आपल्या बाहू पावू द्या रे।।१।।

जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला
रोखा ते, लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला
हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात
सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहिसा अर्थही येऊ द्या रे।।२।।

जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणसुकीची नाती
द्या सर्व दूर ललकारी, फुंकारे एक तुतारी
संदेश राेष जे, द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे।।३।।

(2) खालील पंक्तींचा सरळ अर्थ लिहा: (2)

जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणसुकीची नाती

संक्षेप में उत्तर

उत्तर

(1)

  1. कवितेत आलेल्या नद्यांची नावे - गंगा, यमुना
  2. मनातून वाहून जाण्यात अशा गोष्टी - द्वेष, राेष

(2) भारतीय बांधवानी कसे वागावे, हे सांगताना कवी म्हणतो - जरी आपल्या भारतवर्षामध्ये अनेक धर्म व अनेक जाती नांदत असल्या, तरी आपल्यामधील माणुसकीची नाती नेहमी अतूट राहू द्या. माणुसकीचे माणसांतील नाते एकसंध राहू द्या.

shaalaa.com
हा देश माझा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×