Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील चित्र पाहा. चित्राचे वर्णन करा.
उत्तर
हे एक सुंदर, प्रसन्न सूर्योदयाचे चित्र आहे. डोंगराआडून नुकताच डोकावणारा सूर्य आणि त्याची सोनेरी किरणे आभाळात पसरली आहेत. पक्ष्यांचे थवे आकाशात मोकळेपणाने फिरत आहेत. डोंगरांच्या अलीकडे हिरवीगार झाडी आहे. झाडीपुढे एक टुमदार कौलारू घर आहे. घराभोवती पांढऱ्या फळ्यांचे छान कुंपण आहे. घराच्या दोन्ही बाजूंना दोन झाडे उभी आहेत. घर एका हिरव्यागार गवताच्या टेकडीवर उभे आहे. सगळीकडे हिरवळ पसरली आहे. नुकताच सूर्योदय होत असल्यामुळे वातावरण शांत, प्रसन्न आहे.
संबंधित प्रश्न
अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार-पाच वाक्यांत लिहा.
सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.
रिक्षा खडखड करत थांबली.
____________________
____________________
‘झुळूक मी व्हावे’ कवी दा.अ. कारे यांची कविता मिळवून, त्या कवितेचे वर्गात वाचन करा.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
खोल्या -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
पसारा -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
गोष्ट -
तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पाहा. यादी करा.
तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा व त्याचे सहा-सात वाक्यांत वर्णन करा.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी?