Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्हांला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा.
उत्तर
कष्टाळूपणा, चिकाटी, मेहनतीपणा, कामातला सफाईदारपणा, नीटनेटकेपणा, जबाबदारपणा असे सुगरण पक्ष्याचे चांगले गुण आम्ही विद्यार्थ्यांनी त्याच्याकडून शिकायला हवेत. त्यामुळे, आम्हीसुद्धा आमचा अभ्यास नीटनेटका, अधिक चांगल्या व नियोजनबद्धरीतीने करू. त्याच्या घरटे विणण्याची बरोबरी कोणीही इतर पक्षी करू शकत नाहीत, कारण हे अतिशय कौशल्याचे काम असते, ते तो मन लावून करतो. तसाच आम्हीही मन लावून अभ्यास केला, तर आम्हांलाही नक्कीच 'यश' मिळेल. तसेच, आमच्यापैकी प्रत्येकाला कोणता ना कोणता आवडीचा छंद असतो. आम्हांला ज्या गोष्टीत रस आहे, आवड आहे, ती गोष्ट शिकून, आत्मसात करून त्यात 'उत्तम' बनण्याचा आम्ही प्रयत्न करू. आम्हांला आवडणाऱ्या गोष्टीला अधिक कौशल्यपूर्णतेने सादर करू, त्या त्या विषयात किंवा कलेत पारंगत होऊ.
संबंधित प्रश्न
का ते लिहा.
मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
सळसळ -
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याचे हे घरटे वादळात शाबूत का राहते?
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘बाळ तुझं नाव काय?’’
आंतरजालाचा उपयोग करून भारतीय जलतरणपटू यांची माहिती घ्या. प्रत्येक खेळाडूची माहिती चारपाच वाक्यांत लिहा.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूला समुद्र का बघायचा होता?
चार-पाच ओळींत वर्णन करा.
खेकडा
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता?
तुमच्या मित्राच्या/मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक झाल्याचा प्रसंग घरी व वर्गात सांगा.