Advertisements
Advertisements
प्रश्न
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
उत्तर
वसंतऋतूच्या आधी सृष्टी भकास असते. शिशिर ऋतूमध्ये झाडे निष्पर्ण होतात. कोकिळेच्या मधुर कुजनातून कळते की, वसंतऋतूचे आगमन होत आहे. वसंतऋतू आला की झाडांना पालवी फुटते. झाडे मोहरतात, फुलांनी बहरतात. वेगवेगळी फुलझाडे विविध रंगांच्या फुलांनी सजतात. फुलांचा सुंदर सुगंध आसमंतात पसरतो. काही झाडांच्या पायथ्यांशी फुलांची पखरण होते. डोंगर, पठार व नदीकाठ गवत फुलांनी बहरतात. जंगलात वेगवेगळी फुले फुलतात. आंब्याच्या झाडांना मोहर येतो. अशा प्रकारे सर्व सृष्टी नववधूसारखी सजते. म्हणून वसंतऋतू म्हणजे फुलांचा उत्सव! वसंतऋतू म्हणजे सौंदर्याचा राजा!!
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य अर्थ शोधा.
आस लागणे म्हणजे ______.
संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.
चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.
व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.
व्यायामाने जडत्व वाढते.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती -
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
स्वतःची कामे स्वतः करणारा -
व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
कारण लिहा.
जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
गोष्टी | परिणाम |
वीज चमकणे |
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
पेरणीसाठी लागणारे बियाणे
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
पाराबती करते त्या दोन कृती-
कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
कवितेचा विषय | कवितेतील पात्र | कवितेतील तुम्हांला सर्वांत आवडलेले प्रतिक | कवितेतील नैसर्गिक घटना |
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे आणि त्यावरील अशोकचक्र काय सांगते? ते सद्गुणांची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रेराहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते, की गतिमान राहा. केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया. |
१. चौकटी पूर्ण करा.
(अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक-
(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक-
(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक-
२. झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा.