मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

ग्लायकोलायसीस प्रक्रियेचे सविस्तर लिहा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

ग्लायकोलायसीस प्रक्रियेचे सविस्तर लिहा.

टीपा लिहा

उत्तर

  1. अन्नपदार्थांचे संपूर्ण पचन झाल्यानंतर त्यापासून ग्लुकोज ही शर्करा तयार होते. या ग्लुकोजच्या एका रेणूचे विघटन होणे म्हणजे ग्लायकोलायसीस होय.
  2. ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन या कार्यांत ग्लायकोलायसीसची प्रक्रिया अनुक्रमे ऑक्सिजनच्या सोबत किंवा ऑक्सिजन शिवाय होते.
  3. ऑक्सिश्वसनाच्या वेळी एका ग्लुकोजच्या रेणूपासून पायरुविक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन-दोन रेणू तयार होतात.
  4. नंतर या प्रक्रियेत तयार झालेले पायरुविक आम्लाचे रेणू असेटिल-को-एन्झाइम-A या रेणूमध्ये रूपांतरित होतात. या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साइडचे दोन रेणू आणि NADH2 चे दोन रेणू तयार होतात.
  5. विनॉक्सिश्वसनाच्या वेळी ग्लायकोलायसीसच्या बरोबरच किण्वन होते. त्यामुळे C2H5OH अल्कोहोलची निर्मिती होते. यात ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा मिळते.
  6. ग्लायकोलायसीस प्रक्रियेचा शोध गुस्ताव्ह एम्ब्डेन, ओट्टो मेयरहॉफ आणि जेकब पार्नास या तीन शास्त्रज्ञांनी लावला. यासाठी त्यांनी स्नायूंवर प्रयोग केले. म्हणून ग्लायकोलायसीस प्रक्रियेला 'एम्ब्डेन-मेयरहॉफ-पानास पाथ-वे' किंवा ' ई.एम.पी. पाथ-वे 'असेही म्हणतात.
shaalaa.com
सजीव व ऊर्जानिर्मिती (Living organism and Energy production)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 - स्वाध्याय [पृष्ठ २१]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 2 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1
स्वाध्याय | Q 5. अ. | पृष्ठ २१

संबंधित प्रश्‍न

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण ______ रेणू मिळतात.


व्याख्या लिहा.

पेशीस्तरावरील श्वसन


व्याख्या लिहा.

ऑक्सिश्वसन


व्याख्या लिहा.

ग्लायकोलायसीस


फरक स्पष्ट करा.

ग्लायकोलायसीस आणि क्रेब्‍ज चक्र


फरक स्पष्ट करा.

ऑक्सिश्वसन व विनॉक्सीश्वसन


ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.


क्रेब्‍ज चक्रालाच सायट्रीक आम्लचक्र असेही म्हणतात.


कर्बोदके, स्निग्धपदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होते? खालील तक्ता दुरुस्त करून लिहा.


क्रेब्‍ज चक्र अभिक्रियेसह स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×