Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दोन प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत, ते वाचा. कोणत्या शब्दसमूहांचा अर्थ कळतो व कोणत्या शब्दांवरून कळतो ते समजून घ्या.
शब्दसमूह | शब्दसमूह | शब्दसमूहाचा अर्थ कळतो तो शब्द |
१. मारियाने कुलूप | मारियाने कुलूप उघडले. | उघडले |
२. मारियाने दारे, खिडक्या | मारियाने दारे, खिडक्या बंद केल्या. | बंद केल्या |
३. मारिया आईला | मारिया आईला बिलगली. | बिलगली |
मागील तक्त्यातील दुसऱ्या शब्दसमूहांत कोणती क्रिया झाली हे दाखवणारे शब्द दिले आहेत. उदा., उघडले, बंद केल्या, बिलगली. क्रिया सांगणाऱ्या या शब्दांमुळे वाक्यांचा अर्थ कळतो. या शब्दांना क्रियापद म्हणतात.
उत्तर
स्वतः प्रयत्न करा.
संबंधित प्रश्न
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
कायापालट होणे-
खालील तक्ता पूर्ण करा.
एकवचन | अनेकवचन |
पुस्तक | |
गाव | |
मैदान | |
नदी |
‘जोडशब्द’ लिहा.
अंथरूण-
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.
आमचा कुत्रा मला नेहमी मित्राप्रमाणे भासतो.
खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.
सज्जन × ______
खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.
खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
उंच ×
क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.
मारिया कविता ______
खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचे लिंग ओळखा. तक्ता तयार करून वहीत लिहा.
वाक्ये | लिंग | क्रिया | क्रिया करणारी व्यक्ती | ||
पुरुष | स्त्री | इतर | |||
(अ) कावळा झाडावर राहतो. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(आ) रेश्माने पत्र वाचले. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(इ) पोस्टमनने पत्र दिले. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(ई) मायाने पाकीट उघडले. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(उ) मायाने दार उघडले. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
खालील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा:
रखवालदार