मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील आकृती मध्ये □ABCD हा समलंब चौकोन आहे. AB || DC आहे. P व Q हे अनुक्रमे रेख AD व रेख BC चे मध्यबिंदू आहेत, तर सिद्ध करा की, PQ || AB व PQ = ABDC12(AB+DC) - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील आकृती मध्ये `square`ABCD हा समलंब चौकोन आहे. AB || DC आहे. P व Q हे अनुक्रमे रेख AD व रेख BC चे मध्यबिंदू आहेत, तर सिद्ध करा की, PQ || AB व PQ = `1/2 ("AB" + "DC")`

बेरीज

उत्तर

पक्ष: `square`ABCD हा समलंब चौकोन आहे.

साध्य: PQ || AB व PQ = `1/2`(AB + DC)

रचना: रेख AQ अशी पुढे वाढवा की, बाजू DC ला पुढे वाढवल्यास, ती बिंदु R ला छेदेल.

सिद्धता:

रेख AB || रेख DC व रेख BC त्यांची छेदिका आहे.

∴ ∠ABC ≅ ∠RCB       ...(व्युत्क्रम कोन)

∴ ∠ABQ ≅ ∠RCQ       ...(i)   ...(B-Q-C)

∆ABQ व ∆RCQ मध्ये,

∠ABQ ≅∠RCQ       ...[(i) वरून]

रेख BQ ≅ रेख CQ      ...(Q हा रेख BC चा मध्यबिंदू आहे.)

∠BQA ≅ ∠CQR       ...(परस्पर विरुद्ध कोन)

∴ ∆ABQ ≅ ∆RCQ        ...(कोबाको कसोटी)

रेख AB ≅ रेख CR       ...(एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू)  ...(ii)

रेख AQ ≅ रेख RQ      ...(एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू)  ...(iii)

∆ADR मध्ये,

बिंदु P हा रेख AD चा मध्यबिंदू आहे.       ...(पक्ष)

बिंदु Q हा रेख AR चा मध्यबिंदू आहे.      ...[(iii) वरून]

∴ रेख PQ || बाजू DR        ...(मध्यबिंदूचे प्रमेय)

∴ रेख PQ || बाजू DC      ...(iv)    ...(D-C-R)

∴ बाजू AB || बाजू DC       ...(v)    ...(पक्ष)

∴ रेख PQ || बाजू AB      ...[(iv) व (v) वरून]

PQ = `1/2` DR       ...(मध्यबिंदूचे प्रमेय)

= `1/2` (DC + CR)

= `1/2` (DC + AB)       ...[(ii) वरून]

∴ PQ = `1/2` (AB + DC)

shaalaa.com
त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंचे प्रमेय
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: चौकोन - संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 [पृष्ठ ७४]

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 5 चौकोन
संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 8. | पृष्ठ ७४

संबंधित प्रश्‍न

खालील आकृती मध्ये ΔABC च्या बाजू AB, बाजू BC व बाजू AC चे अनुक्रमे बिंदू X, Y, Z हे मध्यबिंदू आहेत. AB = 5 सेमी, AC = 9 सेमी व BC = 11 सेमी, तर XY, YZ, XZ ची लांबी काढा.


खालील आकृती मध्ये `square`PQRS आणि `square`MNRL हे आयत आहेत. बिंदू M हा PR चा मध्यबिंदू आहे. तर सिद्ध करा.

  1. SL = LR
  2. LN = `1/2` SQ 


खालील आकृती मध्ये ΔABC या समभुज त्रिकोणात बिंदू F, D, E हे अनुक्रमे बाजू AB, बाजू BC, बाजू AC चे मध्यबिंदू आहेत तर ΔFED हा समभुज त्रिकोण आहे हे सिद्ध करा.


आकृती मध्ये रेख PD ही ΔPQR ची मध्यगा आहे. बिंदू T हा PD चा मध्यबिंदू आहे. QT वाढवल्यावर PR ला M बिंदूत छेदतो, तर दाखवा की `"PR"/"PM" = 1/3`.

[सूचना: DN || QM काढा.]


खालील आकृती मध्ये `square`ABCD हा समलंब चौकोन आहे. AB || DC. M आणि N हे अनुक्रमे कर्ण AC व कर्ण DB चे मध्यबिंदू आहेत. तर सिद्ध करा की, MN || AB.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×