Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात. |
१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.
२. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.
उत्तर
१. विद्यार्थ्यांची समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सवयी-
- चांगले साहित्य वाचणे
- योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणे
- योग्य ठिकाणी खर्च करणे
- आवश्यक तेवढेच बोलणे
- नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणे
२. स्वप्रयत्नांच्या बळावर, चांगल्या सवयी असणारी व्यक्ती समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करते आणि स्वत: निवडलेल्या क्षेत्रात हमखास यश मिळवते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन होय.
गणिताची प्रचंड आवड असणाऱ्या रामानुजन यांना शालेय जीवनापासूनच गणिते सोडवणे व विविध गणिती सूत्रांच्या अभ्यासातून नवीन सूत्रे बनवण्याची सवय लागली होती. त्यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी गणितच असे. कदाचित म्हणूनच, रामानुजन झोपेतून जागे झाल्यावर अचानक अवघड सूत्रे लिहून काढत. आपल्याला प्रा. हार्डी या नामवंत गणितज्ज्ञाचे मार्गदर्शन मिळावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी प्रा. हार्डींशी पत्रव्यवहार करून आपली ही इच्छा प्रदर्शित केली, कठोर मेहनत घेतली. त्यांच्यासारख्या असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या मेहनती मुलाला प्रा. हार्डींचे मार्गदर्शन मिळालेच शिवाय इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्तीही मिळाली. या तीन वर्षांच्या काळात त्यांनी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी त्यांना रॉयल सोसायटीसारख्या सन्माननीय संस्थेचे सदस्यत्व बहाल केले गेले.
वरील उदाहरणावरून, चांगल्या सवयी व स्वप्रयत्न यांमुळे व्यक्तिमत्त्व घडते हे स्पष्ट होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
भारतात सर्वांत पहिली रेल्वे ______ येथून सुटली.
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
आश्चर्य -
______ या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.
संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.
‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
सहसंबंध शोधा.
अंधार : तम : : किल्ली : ______
सहसंबंध शोधा.
रमेश : नाम : : ते : ______
पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.
स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातींतील पक्ष्यांचे साम्यघटक लिहा.
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
संगीतमय झाड -
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले.
चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
हिरमुसले होणे |
शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.
‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.
‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.