मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.

सविस्तर उत्तर

उत्तर

हेलनसारख्या दिव्यांग मुलांना शिक्षणात अनेक अडथळे येतात. खासकरून भाषा शिकताना अक्षर, शब्द यांची त्यांना ओळख करून देणे येथेच मोठा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे, अशा मुलांच्या गरजा समजून घेणारा शिक्षक असणे आवश्यक असते. ॲनी सुलिव्हॅन या अशाच शिक्षिका होत्या. शिकवण्याच्या आधी त्यांनी हेलनला मायेने आपलेसे केले. त्यानंतर नवनवीन शब्द शिकवतानाही त्यांनी तिच्या कलानुसार शिकवले. शिकवताना हेलनचा गोंधळ उडाल्यावरही त्यांनी संयम बाळगला. तिला केवळ शब्द ओळख न देता त्यांच्या अर्थाशी तिची ओळख करून दिली. त्यासाठी प्रत्यक्ष बाहुली हातात दिली, पाण्याला स्पर्श करून ‘वॉटर’ हा शब्द शिकवला. अशाप्रकारे, अज्ञानाच्या अंधारात हरवलेल्या हेलनला ज्ञानाचा मार्ग दाखवणाऱ्या ॲनी सुलिव्हॅन या हेलनसाठी ज्ञानदीप ठरल्या, म्हणूनच ‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या, तर ‘हेलन’ घडली नसती’ हे वाक्य सार्थ ठरते.

shaalaa.com
गद्य (9th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 16.1: शब्दांचा खेळ - स्वाध्याय [पृष्ठ ५७]

APPEARS IN

बालभारती Marathi 9 Standard Maharashtra State Board
पाठ 16.1 शब्दांचा खेळ
स्वाध्याय | Q ७. (२) | पृष्ठ ५७

संबंधित प्रश्‍न

आकृतिबंध पूर्ण करा.


शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.


शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.


'बेटा, मी ऐकतो आहे!’ या कथेचे संवादरूपाने लेखन करा.


वाक्य पूर्ण करा.

इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________


आकृतिबंध पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.


कंसातील सूचनेनुसार बदल करा.

याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. (काळ ओळखा)


तुम्हांला समजलेल्या सखू आजीचे व्यक्तिचित्र रेखाटा.


'कुलूप' या पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.


कारणे लिहा.

लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....


चौकट पूर्ण करा.


चूक की बरोबर ते लिहा.

परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती.


वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधांविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.

लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.


चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.

दरारा असणे ______

खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.

हव्याशा क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली.


w-a-t-e-r हा शब्द हेलन कशा शिकल्या ते लिहून आकृती पूर्ण करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×