Advertisements
Advertisements
प्रश्न
कथेची कोणतीही दोन वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर
(१) कथा मनोरंजन करते : कथा मनोरंजन करते म्हणजे कथा वाचताना वाचकाला आनंद मिळतो. त्याचे मन कथेत गुंतून राहते. वाचक कथा वाचताना कथेतील पात्रांच्या जगात प्रवेश करतो. त्याला नेहमीच्या ताणतणावांनी भरलेल्या जगाहून वेगळ्या जगात विहार करायला मिळते. वास्तवातील ताणतणावांपासून तो काही काळ दूर जातो. या घटनेतून त्याला आनंद मिळतो. कथेमार्फत वाचकाला मनुष्यस्वभावाचे अनेक नमुने पाहायला मिळतात. माणसाच्या स्वभावाविषयीची त्याची जाण वाढते. याचा त्याला आनंदच होतो. काही कथा तर विनोदनिर्मितीसाठीच लिहिल्या जातात. त्या कथांमुळे वाचक खळखळून हसतो. या सर्व बाबींमुळे वाचकाचे मनोरंजन होते. कथेचे ते एक मोठे वैशिष्ट्य ठरते.
(२) कथेमुळे सुसंस्कार होतात : कथेमध्ये पात्रे असतात. ती वास्तवातील माणसांसारखीच रंगवलेली असतात. त्यांच्या वागण्याबोलण्यातून, घटना-प्रसंगांतून, चांगल्या-वाईट मूल्यांचे दर्शन घडते. कथेमध्ये चांगल्या व वाईट मूल्यांच्या संघर्षात चांगल्या मूल्यांचा विजय दाखवलेला असतो. या संघर्ष-दर्शनाने वाचकाला प्रेरणा मिळते; स्फूर्ती मिळते. वाचक त्यातून बोध घेतो. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय, मानवता अशा कितीतरी उदात्त मूल्यांचा वाचकाच्या मनावर संस्कार होतो. आपण स्वतःच्या जीवनात कोणत्या मार्गाने जावे, कोणता मार्ग टाळावा याचे दिग्दर्शन होते. हे सुसंस्कारच होत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृती करा.
कथेचे घटक: ______
कृती करा.
कथेची वैशिष्ट्ये: _________
कथा म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा.
कथेचे कोणतेही दोन घटक सोदाहरण स्पष्ट करा.
'कथाकथनासाठी कथेची निवड करणे फार महत्त्वाचे आणि तितकेच जबाबदारीचे काम असते,' हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
कथेच्या लोकप्रियतेची कारणे लिहा.
कथेच्या सादरीकरणासाठी आवश्यक भाषिक कौशल्ये लिहा.
कथेच्या शीर्षकाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
'कथा आजही लोकप्रिय आहे,' या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
प्रभावी कथाकथन करण्यासाठी कथाकथन करणाऱ्याने कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे?
तुम्ही वाचलेली कथा थोडक्यात सादर करा.
पुढील उतारा वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.
नाट्यमयता/संघर्ष: | कथेत चांगल्या-वाईटाचा संघर्ष असतो. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मिक घटनांतूनही नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्षबिंदू नाट्यपूर्णरीतीने साधता येतो; पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो. |
संवाद: | कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्रांच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितिजन्य घटकांनुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय व आंतरिक संगती महत्त्वाची असते. संवादातून रसनिर्मिती आणि रसपरिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात. |
भाषाशैली: |
कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यांनुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते. वरील घटकांशिवाय प्रारंभ, मध्य आणि शेवट असे कथेचे सर्वसाधारणपणे तीन टप्पे मानले जातात. कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून, कधी पात्रांच्या परस्परविरोधी भूमिकांतून तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगांतून होत असते. ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण, जितकी उत्कट तितकी वाचकांची उत्कंठा अधिक तीव्र होते. ही उत्कंठा कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते. कथेच्या रचनाबंधाला यामुळेसौंदर्य प्राप्त होते. कथालेखनात कथेच्या वरील घटकांबरोबरच शीर्षकाचे महत्त्वसुद्धा अनन्यसाधारण आहे. सूचक व अर्थपूर्ण शीर्षक कथेचा आशय उलगडण्यास मदत करते. |
(१) (2)
(i)
(ii)
(२) कथेतील ‘नाटयात्मता’ या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे स्पष्ट करा. (2)
जोड्या लावा:
अ | ब |
(क) इरावती कर्वे | (i) गर्भरेशीम |
(ख) दुर्गा भागवत | (ii) मर्ढेकरांची कविता |
(ग) इंदिरा संत | (iii) पैस |
(घ) विजया राजाध्यक्ष | (iv) युगान्त |
(v) सौंदर्यानुभव |
दिलेल्या उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
कथा वाचताना अनेकदा ‘आता पुढे काय होणार’ अशी उत्सुकता वाचकाच्या मनात निर्माण होते. त्याच्या मनात जिज्ञासा जागी होते. कारण कथानक वाचकाला खिळवून ठेवणारे असते. कथेतील पात्रे आणि प्रसंग यांची गुंफण अशा कौशल्याने केलेली असते, की वाचक त्यात तल्लीन होऊन जातो. वाचकाला वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाणे आणि पुन्हा वर्तमानात आणणे अशा फ्लॅशबॅक लेखनशैलीमुळे कथा उत्कंठावर्धक होते. यादृष्टीने पाठ्यपुस्तकातील ‘शोध’ ही कथा एकदा वाचा. त्या कथेतील आकस्मिक वळणे, नाट्यमय प्रसंग, कथेचा अनपेक्षित शेवट या सर्वांमुळे उत्कंठा शेवटपर्यंत कशी टिकून राहते, हे तुमच्या लक्षात येईल. कथा एककेंद्री असते. कथा भूतकाळात लिहिली जाते. कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. |
(१) (२)
- फ्लॅशबॅक लेखनशैली म्हणजे
- कथा लहान असणे कारण
कथा वाचकांची उत्कंठा वाढवणे
(२) ‘कथा मानवी जीवनाचा वेध घेते’ या विधानाचा समजलेला अर्थ तुमच्या भाषेत लिहा. (२)
जोड्या लावा:
अ गट | ब गट |
(क) शंकर पाटील | (i) एका मुंगीचे महाभारत |
(ख) योगीराज वाघमारे | (ii) बेगड |
(ग) जयंत नारळीकर | (iii) वळीव |
(घ) गंगाधर गाडगीळ | (iv) यक्षाची देणगी |
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) एका वाक्यात उत्तरे लिहा. (२)
(य) कथा उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचण्यामागील कारण लिहा. (१)
(र) कथेतील भाषायोजनेचे घटक लिहा. (१)
कथेत चांगल्या-वाईटाचा संघर्ष असतो. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मिक घटनांतूनही नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्षबिंदू नाट्यपूर्णरीतीने साधता येतो; पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो. कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्रांच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितिजन्य घटकांनुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय व आंतरिक संगती महत्त्वाची असते. संवादातून रसनिर्मिती आणि रसपरिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात. कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यांनुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. कथाकार, त्याचा दृष्टिकोन, त्याची अनुभव घेण्याची पद्धत यांनुसार कथेचे भाषारूप आणि शैलीविशेष निश्चित होत जातात. कथा लिहिताना साधारणत: प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांची सरमिसळ केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते. |
(२) कथेतील संवादाची वैशिष्ट्ये लिहा. (२)